महाराष्ट्रात 'या' चार वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लढवायचीय लोकसभा निवडणूक-wankhede pardeshi among top bureaucrats eye bjp tickets in upcoming lok sabha elections ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रात 'या' चार वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लढवायचीय लोकसभा निवडणूक

महाराष्ट्रात 'या' चार वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लढवायचीय लोकसभा निवडणूक

Feb 20, 2024 10:10 AM IST

Bureaucrats eye BJP tickets in upcoming Lok Sabha elections : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटांवर काही आयएएस अधिकारी यांचे लक्ष आहे. 'हे' अधिकारी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

Bureaucrats eye BJP tickets in upcoming Lok Sabha elections
Bureaucrats eye BJP tickets in upcoming Lok Sabha elections

Bureaucrats eye BJP tickets in upcoming Lok Sabha elections : लोकसभा निवडणुका जवळ आल्याने अनेक इच्छुक मोर्चेबांधणीला लागले आहे. या मोर्चेबांधणीत काही बडे प्रशासकीय अधिकारी देखील पुढे असल्याची माहिती आहे. राज्यातील चार अधिकारी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री कार्यालय सांभाळणारे निवृत्त आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी, मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे राधेश्याम मोपलवार, आयआरएस अधिकारी उज्ज्वल चव्हाण यांनी नुकताच अतिरिक्त आयुक्त, आयकर अपील न्यायाधिकरण या पदाचा राजीनामा दिला. तर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर वादात सापडलेला समीर वानखेडे हे देखील लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

Maratha Reservation : मराठ्यांना मिळणार १० टक्के आरक्षण! आज अधिवेशात होणार शिक्कामोर्तब

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे, विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. वानखडे हे विदर्भातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ड्रग्ज रॅकेट प्रकरणात वादात वानखडे सापडले होते तेव्हा ते एनसीबीचे (पश्चिम क्षेत्र) झोनल डायरेक्टर होते. यानंतर त्याच्यावर खंडणीचे आरोप झाले ज्याची आता चौकशी सुरू आहे. सध्या आयकर अपील न्यायाधिकरणात त्यांची नियुक्ती आहे. वानखडे आणि त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हे दोघेही सध्या वाशिम जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी वाशीम-यवतमाळ मतदारसंघातून ते निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, वानखेडे यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, “समीर एक चांगला आणि सर्वोत्तम तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहे. त्याच्या सेवेत फक्त दोन पदोन्नती शिल्लक आहेत आणि त्याने मोठी पदे जबाबदरीने सांभाळली आहे. आता त्याला आम्हाला राजकारणात बघायचे आहे.

Jammu-Kashmir Earthquake : लडाखसह जम्मू-काश्मीर हादरले; ५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

महाराष्ट्राच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी हे मध्य महाराष्ट्रातील उस्मानाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या ठिकाणी सध्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. दरम्यान, या जागेवर शिंदे गटाने देखील दावा केला आहे. असे असेले तरी भाजपही येथून आपला उमेदवार उभा करण्यास उत्सुक आहे. १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले परदेशी यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव, मुंबई आणि पुण्याचे महापालिका आयुक्त आणि लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. तर १९९३ च्या भूकंपानंतर मदत आणि पुनर्वसनासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचे कौतुक देखील करण्यात आले. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची केंद्र सरकारच्या क्षमता निर्माण आयोगाचे सदस्य (प्रशासन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे सरकारने सत्ता सांभाळताच त्यांची मित्राच्या सीईओपदी नियुक्ती झाली. परदेशी यांनी निवडणूक लढवण्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. असे असले तरी त्यांनी उस्मानाबादमधील त्यांचे कार्य सर्व सामान्य नगरिकां पर्यंत पोहचवण्यासाठी एक सोशल मीडिया टीम देखील टायर केली आहे. ही टीम त्यांची प्रतिमा सध्या मतदार संघात तयार करण्यास लागली आहे.

Passport of India : फ्रान्सचा पासपोर्ट बनला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट! भारताचे क्रमवारीत कितवे स्थान?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) प्रमुख असलेले मोपलवार नुकतेच निवृत्त झाले आहेत. ते मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ही जागा शिवसेनेने २०१९ मध्ये जिंकली होती, परंतु सध्या त्यांचे प्रतिनिधित्व शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेचे खासदार हेमंत पाटील करत आहेत.

मोपलवार हे राज्य सरकारमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आणि नंतर त्यांची आयएएस केडरमध्ये नियुक्ती झाली. नुकतेच ते एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवृत्त झाले. या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी निवडणूक लढण्याच्या त्यांच्या तयारीला नकार दिला, परंतु राजकीय वर्तुळात ते निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. नजर मतदारसंघावर आहे.

उज्वल चव्हाण हे जळगाव जिल्ह्यातील धामणगावचे आहेत. सध्या ते सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिकांच्या संपर्कात आहे. भाजपच्या एका मंत्र्याने सांगितले की त्यांनी पक्षाच्या आश्वासनानंतरच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आयआरएसमधून बाहेर पडण्याचे कारण त्यांना विचारले असता चव्हाण म्हणाले: “मी कायदेशीर सल्लामसलत आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या क्षेत्रातील वकील म्हणून चांगले करियर निवडले आहे. मी कायद्याचा सराव करेन.” भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले. "जेव्हा संधि मिळेल तेव्हा या बाबत निर्णय घेईल."

शेजारच्या कर्नाटकातील आणखी एक सेवानिवृत्त अधिकारी मनोज वसंत बाडकर हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ते नुकतेच कोस्ट गार्डच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. ते उत्तरा कन्नड जिल्ह्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मुळ वडाळ्याचे सध्याचे रहिवासी असलेले बाडकर कर्नाटकातील कारवार येथील रहिवासी आहेत. ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर, ते पुन्हा त्यांच्या मुळगावी कारवार येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय जमला होता.