बेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का

बेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का

Jan 22, 2025 01:55 PM IST

Walmik Karad Property Income Tax: वाल्मिक कराडची बेहिशेबी संपत्ती असल्याचं आता उघड झालं आहे. पुण्यात आणि परदेशात देखील त्याची संपत्ती असल्याचं पुढ आहे.

बेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का
बेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का

Walmik Karad Property Income Tax: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीकचे अनेक प्रकरण उघडकीस येऊ लागले आहेत. त्याची पुण्यात बेहिशेबी संपत्ती असल्याचं उघड झालं आहे. त्याच्या दोन्ही बायकांच्या नावे ही संपत्ती आहे. दरम्यान, वाल्मीक सरकारला किती रुपयांचा टॅक्स द्यायचा याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी पाहून तुम्हाला धक्का बसेल.

वाल्मीक कराड हा एकेकाही साधा कामगार असतांना त्याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी जमवली हा प्रश्न उपस्थित होत आहे. वाल्मिक कराड व त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात अनेक फ्लॅट व संपत्ती असल्याचं उघड झालं आहे. या संपत्तीवर वाल्मीक किती टॅक्स भरायचा याची देखील माहिती समोर आली आहे.

वाल्मीक कराड किती टॅक्स भरायचा

कोट्यवधी रूपयांची संपत्ती असलेला वाल्मीक सरकारला किती टॅक्स भरत असेल याचा आकडा समोर आला आहे. वाल्मिक कराड आयकर विभागाला वार्षिक जवळपास ९६ लाख रुपये कर भरत होता, अशी माहिती आहे. असे असताना देखील त्याने मालमत्ता कर थकवल्याने पिंपरी-चिंववड पालिकेने त्याच्या बाणेर येथील सोसायटीतील फ्लॅट सील केला आहे. भारतात सर्वांना टॅक्स भरावा लागतो. त्याच्या कमाईच्या तुलनेत हा टॅक्स वसूल केला जातो. वाल्मीक कराड करे मोठ्या प्रमाणात संपत्ती असून या साठी तो ९६ वार्षिक ९६ लाख टॅक्स भरत होता. दरम्यान, सीआयाडीच्या पथकाला त्याची परदेशात देखील संपत्ती असल्याचा संशय आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडला बीड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. या पूर्वी त्याला खंडणी प्रकरणात २१ दिवसाची कोठडी झाली आहे. वाल्मीक कराडला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. वाल्मीकवर सध्या खंडणी व मकोका प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर