धनंजय मुंडेंसमोरच वाल्मीक कराडने मला चुकीचा स्पर्श केला, मारहाण केली..."; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धनंजय मुंडेंसमोरच वाल्मीक कराडने मला चुकीचा स्पर्श केला, मारहाण केली..."; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

धनंजय मुंडेंसमोरच वाल्मीक कराडने मला चुकीचा स्पर्श केला, मारहाण केली..."; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

Published Feb 07, 2025 04:09 PM IST

Karuna Sharma On walmik Karad : धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

करुणा शर्मां यांचे वाल्मीक कराडवर गंभीर आरोप
करुणा शर्मां यांचे वाल्मीक कराडवर गंभीर आरोप

Karuna Sharma on Walmik Karad: वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी करुणा शर्मा यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचे निरीक्षण नोंदवत मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दरमहा २ लाख रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश दिले. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या या निकालानंतर करुण शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना महिन्याला १५ लाख रुपयांच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यावरही खळबळजनक आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. यावेळी धनंजय मुंडे सुद्धा तेथे उपस्थित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे वाल्मिक कराडचा पाय अजून खोलात गेला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येचा तपास करताना त्याचे खंडणीप्रकरण समोर आले आणि त्याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. तर पीक विमा घोटाळ्यापासून ते हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत वाल्मीकचा सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे.

करुणा शर्मा म्हणाल्या, बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोरच वाल्मीक कराड याने माझ्यावर हात उगारला होता. त्याचबरोबर त्यानेमाझ्या अंगाला चुकीचा स्पर्श करत गैरवर्तन केल्याचाआरोप शर्मा यांनी केला. माझ्या पतीसमोर कराड याने माझ्यावर हात उगारला. मी यावेळीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी मागणी केली होती. पण मला ते अजूनही मिळालेले नाही. बीडीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही शर्मा यांनी केलीआहे.

वाल्मिक कराडविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या. तसेच माझ्या गाडीत रिव्हॉल्वरठेऊन मला तीन वर्षासाठी टाकली होती. तुरुंगात टाकण्याचा प्लान होता. ती केसही मी औरंगाबाद कोर्टात जिंकले. जनतेने माझे व्हिडीओ व्हायरल केले. मीडियाने दाखवले. त्यामुळे मी वाचले, असे करुणा शर्मा म्हणाल्या.

 

न्यायालयाचा धनंजय मुंडेंना दणका -

करुणा शर्मा यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचे निरीक्षण नोंदवत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना जोरदार दणका देत करुणा यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये देण्याचा आदेश दिला. तर त्यांच्या मुलीसाठी ७५ हजार रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देशही दिले. अशा प्रकारे मुंडे यांना महिन्याला २ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. करुणा यांचा मुलगा २१ वर्षांचा असल्याने न्यायालयाने त्याच्यासाठी देखभालीचा खर्च देण्यास नकार दिला आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर