मोठी बातमी! वाल्मिक कराडला केज न्यायालयाचा दणका! १४ दिवसांची सीआयडी कोठडी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी! वाल्मिक कराडला केज न्यायालयाचा दणका! १४ दिवसांची सीआयडी कोठडी

मोठी बातमी! वाल्मिक कराडला केज न्यायालयाचा दणका! १४ दिवसांची सीआयडी कोठडी

Jan 01, 2025 07:22 AM IST

Walmik Karad Kej Court : वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीच्या ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला केज येथे नेण्यात आले. कराडला केज कोर्टाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी दिली आहे.

मोठी बातमी! वाल्मिक कराडला केज न्यायालयाचा दणका! १४ दिवसांची सीआयडी कोठडी
मोठी बातमी! वाल्मिक कराडला केज न्यायालयाचा दणका! १४ दिवसांची सीआयडी कोठडी

Walmik Karad Kej Court : संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. यानंतर त्याला विशेष सुरक्षेत केज येथे नेण्यात आले. त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कराडवर खंडणीसह हत्या प्रकरणाचा आरोप असल्याचं सांगत त्याच्या कोठडीची मागणी केली. सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून केज न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावली आहे.त्यामुळे पुढील काही दिवस वाल्मीक कराडचा मुक्काम हा कोठडीत राहणार आहे.

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात व पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी फरार असलेला वाल्मीक कराडने पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांपुढे मंगळवारी आत्मसमर्पण केलं. वाल्मीक कराड त्याच्या कार्यकर्त्यांसह दोन गाड्यातून सीआयडीच्या अधिकाऱ्यांपुढे शरण आला होता. खंडणी व हत्येचा गुन्हा वाल्मीक कराडवर होता. तब्बल दोन आठवडे वाल्मीकने पोलिसांना गुंगारा दिला होता. अखेर सीआयडीने दबाव वाढवल्याने वाल्मिक कराड मंगळवारी दुपारी पोलिसांना शरण आला. त्या पूर्वी त्याने व्हिडिओ पोस्ट करत, माझ्यावर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला अटकपूर्व जामीन मिळवण्याचा अधिकार असतांना देखील पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव या घटनेशी जोडले जात आहे. जर पोलिस तपासात यात मी दोषी आढळलो तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे कराड याने म्हटले. यानंतर त्याने पुण्यातील पाषाण रस्त्यालगत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्य कार्यालयात जात शरण आला. यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची जुजबी चौकशी करून त्याला बीड येथे केजच्या न्यायालयात हजर केले.

खंडणी व हत्या प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केज न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर त्यांची सुनावणी झाली. यानंतर त्यांना १४ दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली. वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे यांनी त्याची बाजू कोर्टात मांडली. तर सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी सरकारी बाजू मांडली. सीआयडीचे वकील म्हणून जे.बी. शिंदे यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीशांनी वाल्मिक कराड यांना पोलीस विरोधात तक्रार आहे का ?असं विचारलं, यावर वाल्मिक कराड यांनी नाही असं उत्तर दिलं. दरम्यान, दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले. यानंतर कोठडी देण्यात आली. वाल्मीक कराड याला कोर्टात आणले तेव्हा त्याला पाहण्यासाठी कोर्ट परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर