Walmik Karad health News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची प्रकृती मध्यरात्री अचानक खराब झाली. त्याच्या पोटात दुखत असल्याने तसेच त्याला ताप आल्याने त्याला मध्यरात्री बीडच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील अतिदक्षताविभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा देखील करण्यात आला आहे. वाल्मीक आहे पुण्यात सीआयडीच्या पथकाला शरण आला होता. त्यानंतर त्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्री वाल्मीक कराडला अस्वस्त वाटू लागलं. त्याच्या पोटात दुखायला लागल्याने वाल्मिक कराडची सोनोग्राफी करण्यात आली. डॉक्टरांनी त्याची मधुमेह व रक्तदाबाची तपासणी केली. वाल्मीकचा त्रास वाढल्याने त्याला १२ च्या सुमारास बीडच्या कारागृहातून बाहेर नेत सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
बुधवारी वाल्मीक कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीकला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. खंडणी व मकोका प्रकरणी ही कोठडी वाल्मीकला देण्यात आली होती. वाल्मिक कराडला सर्दी, ताप, खोकला असल्याने त्याला वैद्यकीय पथकाने औषधे देखील होती. त्यानंतर रात्री त्याच्या पोटात अचानक दुखणे सुरू झाले. त्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले.
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीला १८० दिवस तुरुंगात काढावे लागते. त्यामुळे वाल्मिक कराडला तुरुंगातच रहावे लागणार आहे. वाल्मीकला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामीन मिळण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, त्याला पुढचे सहा महिनेतरी जेलमध्येच रहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या