Walmik Karad News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. वाल्मीक कराडला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. खंडणी व मकोका प्रकरणी ही कोठडी वाल्मीकला देण्यात आली आहे.
बीडच्या मोका विशेष न्यायालयात आज बुधवारी साडेअकरा वाजता वाल्मिक कराडच्या खटल्यावर सुनावणी झाली. त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडला थेट न्यायालयात न नेता त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. या पूर्वी वाल्मिकची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वाल्मिक कराडला सर्दी, ताप, खोकला असल्याने वैद्यकीय पथकाने त्याला औषधे दिल्याची माहिती आहे.
न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने तसेच खुनाच्या कटात संशयित असल्याने गुन्हा दाखल आहे. या सोबतच खंडणी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. यामुळे न्यायालयात पोलिसांनी केलेल्या युक्तिवादावरून वाल्मीकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सीआयडीने त्यांची चौकशी पूर्ण केल्याने कराडची कोठडी मागितली नाही. वाल्मीकला या पूर्वी २१ दिवसांची कोठडी झाली होती. वाल्मीकला मकोका लावण्यात आल्याने त्याला तुर्तास जामीन मिळणे कठीण आहे, असे म्हटल्या जाते.
वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात शरण आला होता. वाल्मिक कराड तेव्हापासून बीड पोलिसांच्या ताब्यात आहे. कराडच्या समर्थकांनी मोठे आंदोलंन केले होते. दरम्यान, त्याच्यावर मकोका लावण्यासाठी देखील मोठे आंदोलंन झाले होते. त्यानंतर वाल्मीकवर मकोका लावण्यात आला होता. यापूर्वी खंडणीसाठी त्याला कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही वाल्मिकला न्यायालयीन कोठडीत देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या