मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wake Up Punekar : पुण्यातील समस्या सोडविण्यासाठी लोकचळवळ, जागे होणार का पुणेकर?

Wake Up Punekar : पुण्यातील समस्या सोडविण्यासाठी लोकचळवळ, जागे होणार का पुणेकर?

Feb 08, 2024 04:57 PM IST

Wakeup Punekar : पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर उत्तरेही पुणेकरांकडूनच घेऊन ती संबंधित खात्याकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी वेकअप पुणेकर ही लोकचळवळ सुरू केली आहे.

Wakeup Punekar
Wakeup Punekar

Wake Up पुणेकर या लोकचळवळी अंतर्गत पुणेकरांच्या ट्रॅफिकच्या समस्या निराकरणासाठी अडकलाय_पुणेकर हे अभियान स्वारगेट चौकात आज (गुरुवार) सकाळी १० वाजता पार पडले. पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर उत्तरेही पुणेकरांकडूनच घेऊन ती संबंधित खात्याकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘#वेकअप पुणेकर’ (Wakeup Punekar) ही लोकचळवळ ५ फेब्रुवारीपासून राबवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘वेकअप पुणेकर’चे संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी ही माहिती दिली. पुण्यातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी ‘#अडकलाय पुणेकर’ मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहन जोशी म्हणाले, १० वर्षांपूर्वी India’s Most Livable City असे अभिमानाने सांगणारे आपण सर्व पुणेकर आज ट्रॅफिकच्या समस्येने प्रचंड त्रस्त आहेत. गेल्या दहा वर्षात पुण्याचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली त्याबरोबर ट्रॅफिक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवेचे प्रदुषण याबाबतचे प्रश्नही निर्माण झाले. या प्रश्नांवर उपाययोजना काय असाव्यात? याची उत्तरे पुणेकरांकडूनच घ्यावीत, त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल, जनमताचा रेटा निर्माण झाला की समस्या नेमकेपणाने सोडविणे अधिक सोपे जाईल. अशा उद्देशाने ‘#वेकअप पुणेकर’ ही लोकचळवळ उभी करीत आहोत. यात स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, विविध विषयांचे तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असतील.”

या लोकचळवळीच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्यासाठी सर्वात त्रासदायक असलेल्या ट्रॅफिकच्या समस्येवर “#अडकलाय_पुणेकर” ही मोहीम राबवत आहोत. या मोहिमेच्या माध्यामातून ट्रॅफिक समस्येवर काम करणाऱ्या विविध एनजीओ, जागरूक नागरिक, विविध विषयांतील तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आदींना एकत्रित करून पुण्यातील प्रश्नांचे पुणेकरांच्याच माध्यमातून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. 

या लोकचळवळीच्या माध्यमातून त्यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या ट्रॅफिक संदर्भातील समस्या त्यांनी दिलेल्या QR कोडला स्कॅन करून तिथे एक प्रश्नावली दिली आहे ती भरून द्यावी आणि आपल्या बहुमूल्य सूचना आम्हांस द्याव्यात. यासोबतच #अडकलाय_पुणेकर हा हॅशटॅग आपल्या समस्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडण्यासाठी वापरावे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग