Mumbai: मित्राकडून आधारकार्डचा गैरवापर; सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकल्यानं तरुणाची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मित्राकडून आधारकार्डचा गैरवापर; सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकल्यानं तरुणाची आत्महत्या

Mumbai: मित्राकडून आधारकार्डचा गैरवापर; सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकल्यानं तरुणाची आत्महत्या

Dec 28, 2024 07:59 AM IST

Wadala Sex Racket Case: मित्रामुळे सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकलेल्या मुंबईतील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली.

मुंबई: मित्राकडून आधारकार्डचा गैरवापर; सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकल्यानं तरुणाची आत्महत्या
मुंबई: मित्राकडून आधारकार्डचा गैरवापर; सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकल्यानं तरुणाची आत्महत्या

27-Year-Old Dies By Suicide In Mumbai: वडाळा सेक्स रॅकेट आणि ब्लॅकमेल प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मित्राने आत्महत्या केल्याची घटना घडली. मुख्य आरोपी हा मुलींना कामाला लावण्याचे आमिष दाखवून लॉजवर घेऊन जायचा. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन त्यांचे अश्लील फोटो काढायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा. मात्र, मुलींना लॉजवर घेऊन जाण्यासाठी आरोपी मृत व्यक्तीचे आधार कार्ड वापरायचा. ज्यामुळे त्याला पोलीस चौकशीला सामोरे जावा लागले. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये तरुणाने त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार लिहिला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तन्मय केणी (वय, २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील प्रतीक्षा नगर येथे राहायला असून गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता होता. त्यानंतर गुरुवारी मुलुंडमधील छेडा पेट्रोल पंपाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सापडली, ज्यात वडाळा सेक्स रॅकेट आणि ब्लॅकमेल प्रकरणातील अटक आरोपी सचिन करंजे (वय, २५) याने तन्मयच्या आधारकार्डचा गैरवापर करून घृणास्पद कृत्य केल्याचा ठपका ठेवला आहे. याप्रकरणी करंजे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

पोलिसांना सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये असे लिहिले आहे की, 'माझा मित्र सचिन करंजे याने सुसाइट नोटचा गैरवापर करून मला फसवले आणि ब्लॅकमेल केले. सचिनकडून होणाऱ्या त्रासामुळे मी माजे जीवन संपवत आहे. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. आई आणि बाबा, मला माफ करा.' मिळालेल्या माहितीनुसार, सचिन करंजे हा तन्मयच्या आधारकार्डचा वापर करून लॉज बूक करायचा, जिथे तो मुलींना कामाला लावण्याचे आमिष दाखवून बोलवायचा. त्यानंतर मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांचे अश्लील फोटो काढायचा आणि ब्लॅकमेल करायचा. अनेक मुलींसोबत त्याने असे केले. परंतु, एका मुलीने याबाबत वडाळा पोलिसांत तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सचिन करंजेला अटक केली आणि तन्मयला डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले. मात्र, घाबरलेला तन्मय पोलीस ठाण्यातून पळून गेला. गेल्या १० दिवसांपासून तो बेपत्ता होता. अखेर २६ डिसेंबर रोजी तो मुलुंड येथे मनगट कापलेल्या अवस्थेत सापडला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तन्मयला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी सचिन करंजे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

 

आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही

भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा मानसिक तणावातून लोक आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल, याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणती चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर