Vishalgad Encroachment : विशाळगड परिसरात जाळपोळ व तोडफोडी प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vishalgad Encroachment : विशाळगड परिसरात जाळपोळ व तोडफोडी प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा

Vishalgad Encroachment : विशाळगड परिसरात जाळपोळ व तोडफोडी प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा

Updated Jul 15, 2024 04:58 PM IST

Vishalgadencroachmentdisputecase : विशाळगडाजवळील गजापूर येथे दगडफेक व जाळपोळ केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajirajechhatrapati) यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा दाखल
संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा दाखल

Vishalgadencroachmentdispute: कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनीसुरू केलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी संघटनांनी विशाळगडाजवळील गजापूर येथे दगडफेक व जाळपोळ करत अनेक घरांचे तसेच वाहनांचे नुकसान केले.यातोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajirajechhatrapati) यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे बेकायदेशीर जमाव जमवणेआणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी या सर्वजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विविध प्रकारच्या १०हूनअधिक कलमांतर्गत शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाळगड (Vishalgad ) व गजापूर परिसरात रविवारी जमावाने काही घरांची,  वाहनांची तोडफोड केली होती. अनेक घरांना आगी लावल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला सुरूवात केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (caseregister against sambhaji raje chhatrapati) आतापर्यंत पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कोल्हापूरसह इचलकरंजीतील अनेक जणांचा समावेश आहे. या प्रकरणात अजूनही काही जणांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सहा पथकं विशाळगडावर दाखल झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कंत्राटदारांमार्फत पथके तयार करण्यात आली आहेत. आजपासून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात झाली आहे.

रविवारी सकाळी विशाळगडावरील रहमान मलिक दर्ग्याजवळ जय श्रीरामच्या घोषणा देत दगडफेकीचा प्रकार घडला होता. यामध्ये अनेक नागरिकांसह पोलीस कर्मचारी व अधिकारीही जखमी झाले होते. त्यानंतर याचे पडसाद गडाजवळच्या गजापूर येथे उमटले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे गडाच्या पायथ्याशी आगमन झाल्यावर जय भवानी जय शिवाजी, विशाळगड अतिक्रमण मुक्त करा अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी संभाजीराजे यांना गडावर जाण्यास प्रतिबंध केल्यानंतर जमावाने भर पावसात घरांची जाळपोळ करण्यात आली. जमावाने एका घरात सिलेंडरचा स्फोट केला. कित्येक घरे पेटवून देण्यात आली. शेकडो दुचाकी,मोटारी यांची नासधूस करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर