मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Virar Crime: कामावर निघालेल्या पत्नीवर भररस्त्यात चाकू हल्ला, घरगुती वादातून पतीचे कृत्य

Virar Crime: कामावर निघालेल्या पत्नीवर भररस्त्यात चाकू हल्ला, घरगुती वादातून पतीचे कृत्य

Jul 04, 2024 05:40 PM IST

Husband Attack Wife : वर्शिला कामावर जाण्यासाठी निघाली असताना पतीने तिला रस्त्यात गाठले व तिच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेच्या मानेला आणि हाताला जखमा झाल्या आहेत.

पत्नीवर भररस्त्यात चाकू हल्ला (सांकेतिक छायाचित्र)
पत्नीवर भररस्त्यात चाकू हल्ला (सांकेतिक छायाचित्र)

Virar Crime News : एकतर्फी प्रेमातून वसईमध्ये भरदिवसा एका तरूणीची हत्या केल्याची घटना ताजी असताना ता विरार रेल्वे पुलावरही तशाच प्रकारची घटना घडली आहे. घरगुती वादातून नवऱ्याने आपल्या पत्नीली भररस्त्यात गाठून तिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. यात महिला गंभीररित्या जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्शीला शर्मा (२७) असे जखमी महिलेचे नाव आहे. तिच्यावर तिचा पती शिव शर्मा याने चाकू हल्ला केला होता.

वर्शिला कामावर जाण्यासाठी निघाली असताना पतीने तिला रस्त्यात गाठले व तिच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेच्या मानेला आणि हाताला जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे विरार रेल्वे स्थानकाच्या पुलावर मोठी खळबळ उडाली होती. ही घटना ३ जूलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. वर्शिला घरकामासाठी मुंबईत जात होती. कामावर जात असताना सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पतीने तिच्यावर चाकू हल्ला केला.

जखमी महिलेला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जखमी वर्शिला शर्मा घरकाम करत असते. बुधवारीही त्या दररोजच्या प्रमाणे नेहमीप्रमाणे विरार रेल्वे पुलावरून कामावर जात होती. त्याआधी पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. वर्शिला घराबाहेर पडताच पती शिवही तावातावाने घराबाहेर पडला. विरार रेल्वे पुलावर तिला गाठून शिव याने पाठीमागून वर्शिलावर चाकूहल्ला केला.

हा प्रकार पाहून आजुबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान राखत महिलेचा जीव वाचला. लोकांनी शिवला हाकलून देत महिलेला तातडीने विरारमधील संजीवनी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी शिवाला अटक केली आहे. घरगुती वादातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीविरूद्ध भादंवि कलम १०९ अन्वये वसई रेल्वे पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्शिला घरकाम करत असल्याची माहिती दिली जात आहे.

भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; ठाण्यातील धक्कादायक घटना -

ठाण्यातील वर्तक नगर परिसरात भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. फिर्यादी महिला श्वानप्रेमी असून एका ठिकाणी मोलकरीण आहे. सुप्रिया या काम संपल्यानंतर संध्याकाळी समता नगर परिसरातील भटक्या कुत्र्यांना खायला घालते.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर