Viral Video: सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला अन् थेट १०० फूट खोल दरीत कोसळली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर-viral video woman falls into 100 feet gorge while taking selfie in satara borne ghat ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला अन् थेट १०० फूट खोल दरीत कोसळली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Viral Video: सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला अन् थेट १०० फूट खोल दरीत कोसळली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Aug 04, 2024 05:58 PM IST

Woman Falls Into 100 Feet Gorge In Satara: सातारा जिल्ह्यातील उंगार रोडवरील बोरणे घाटात सेल्फी घेताना महिला १०० दरीत कोसळली.

सेल्फी घेताना महिला १०० दरीत कोसळली
सेल्फी घेताना महिला १०० दरीत कोसळली

Satara Borne Ghat Viral Video: सातारा (Satara) जिल्ह्यातील उंगार रोडवरील बोरणे घाटात (Borne Ghat) सेल्फी घेताना एक महिला १०० फूट खोल दरीत पडल्याची घटना उघडकीस आली. स्थानिकांनी दोरीचा वापर करून तिला वाचवण्यात यश मिळविले. संबंधित महिला पावसाचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी बोरणे घाटात गेलेले असताना ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार स्थानिक लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिला दरीत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक लोकांनी वेळ न घालवता बचावकार्याला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दरीत कोसळलेल्या महिलेला वाचवण्यासाठी एक पुरुष दोरीच्या सहाय्याने खाली उतरला आणि तिला घेऊन वर येताना दिसत आहे. महिलेला परत आणले जात असताना ती वेदनेने ओरडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत महिलेला दुखापती झाल्या असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, नसरीन अमीर कुरेशी (वय, २९) असे महिलेचे नाव आहे. नसरीन ही पुण्यातील वारजे येथील रहिवासी असून काही जणांसोबत साताऱ्यातील संगमनगरमध्ये आले. त्यांनी ठोसेघर येथे भटकंती केली. परंतु, ठोसेघर धबधबा बंद होता. यानंतर बोरणे घाटात आल्यानंतर नसरीनसह सगळेजण कारमधून बाहेर आले आणि फोटो काढायला सुरुवात केली. त्यावेळी सेल्फी घेत असताना नसरीनचा पाय घसरला आणि ती १०० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, नसरीन एका झाडाला अडकल्याने तिचा जीव वाचला.

महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू

नसरीन दरीत पडल्याची माहिती तिच्यासोबत असलेल्या तरुणांनी सातारा पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलावून घेतले. यानंतर होमगार्ड अभिजित मांडवे दरीत उतरला आणि त्याने दोरीच्या सहाय्याने महिलेला बाहेर काढले. या घटनेत नसरीन कुरेशी गंभीर जखमी झाली. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भुशी डॅम दुर्घटनेनंतर संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली. अनेक ठिकाणी पर्यटकांना धबधबे, नदी, धरण परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, तरीही अनेकजण आपला जीव धोक्यात टाकून धोकादायक ठिकाणी फिरायला जात आहेत.

विभाग