Beed: बीडमध्ये गुंडांची दहशत; बिल मागायला गेलेल्या वेटरला कारनं एक किलोमिटर फरफटत नेलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed: बीडमध्ये गुंडांची दहशत; बिल मागायला गेलेल्या वेटरला कारनं एक किलोमिटर फरफटत नेलं!

Beed: बीडमध्ये गुंडांची दहशत; बिल मागायला गेलेल्या वेटरला कारनं एक किलोमिटर फरफटत नेलं!

Sep 14, 2024 06:51 PM IST

Beed Restaurant Waiter Abducted: बीडमध्ये जेवणाचे पैसे मागायला आलेल्या वेटरला कारने एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली.

बिल मागायला गेलेल्या वेटरला कारनं एक किलोमिटर फरफटत नेलं
बिल मागायला गेलेल्या वेटरला कारनं एक किलोमिटर फरफटत नेलं

Beed Viral Video: बीड जिल्ह्यातील माजलगावजवळील दिंद्रुड गावातील एका ढाब्यात काम करणाऱ्या वेटरला कारने एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी वेटरने दिलेल्या तक्रारीनुसार, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी सखाराम जनार्दन मुंडे हा दोन जणांसह बीड येथील दिंद्रुड गावातील एका ढाब्यात जेवायला आले. पोटभरून जेवल्यानंतर आरोपींनी बिल भरण्यासाठी क्यूआर कोड आणण्यास सांगितले. त्यानंतर पैसे देण्याऐवजी त्यांच्या गाडीतून पळू लागले. आरोपींना पळून जाताना पाहून वेटर शेख साहिल अनुसुद्दीन स्कॅनर घेऊन कारच्या दिशेने धावला. मात्र, आरोपींनी कार थांबवण्याऐवजी वेटरला एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वेटर शेख साहिल अनुसुद्दीन यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पैसे मागायला गेले असता आरोपींनी त्याला कारने एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. तसेच त्याच्या खिशातील सुमारे ११ हजार ५०० रुपये काढून घेतले. यानंतर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला निर्जनस्थळी घेऊन गेले आणि रात्रभर मारहाण केली. अखेर रविवारी सकाळी आरोपींनी वेटरला धारूर तालुक्यातील भाईजाली शिवरा येथे सोडले. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नागपूर ऑडी प्रकरण: बारमधील सीसीटीव्ही फुटेज गायब

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी ऑडी दुर्घटनेपूर्वी भेट दिलेल्या बारमधील सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कारने रामदासपेठेत सोमवारी पहाटे अनेक वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. पोलिसांनी डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर जप्त केला आहे. ऑडीने धडक दिलेल्या एका कारने गाडीचा पाठलाग करून बावनकुळे यांचे मित्र हावरे आणि रोनित चितवामवार यांना अटक केली. अपघातापूर्वी ते ज्या बारमध्ये बसले होते, तेथील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहेत. पोलिसांनी बुधवारी त्यांचा डीव्हीआर जप्त केला असून तो फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी कारमधील तिघांची चौकशी केली. कारचालकाला अटक केली, पण नंतर तो जामीनपात्र गुन्हा असल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आला. रहिवाशांचे वैद्यकीय नमुने फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर