Viral Video: ब्रेड खाण्यापूर्वी आता १० वेळा विचार कराल; बेकरीतील या व्हिडिओमुळे अनेकांचे डोळे उघडले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: ब्रेड खाण्यापूर्वी आता १० वेळा विचार कराल; बेकरीतील या व्हिडिओमुळे अनेकांचे डोळे उघडले

Viral Video: ब्रेड खाण्यापूर्वी आता १० वेळा विचार कराल; बेकरीतील या व्हिडिओमुळे अनेकांचे डोळे उघडले

Feb 09, 2024 09:04 PM IST

Bread Making Viral Video : बेकरीमध्ये ब्रेड कसे बनवले जातात? याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Snapshot of the bread being made in a factory.
Snapshot of the bread being made in a factory. (Instagram/@planetashish)

ब्रेड असंख्य लोकांचा आवडता पदार्थ आहे, असे म्हणणे वावगं ठरणार नाही. कारण लोक त्यासह विविध पाककृती बनवतात. परंतु, आपण कधी विचार केला आहे का? बेकरीमध्ये ब्रेड कसा बनवला जातो. सध्या सोशल मीडियावर ब्रेड कसा तयार केल जातो हे दाखवणाऱ्या एका व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ही प्रक्रिया पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

@planetashish हँडलवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. या व्हायरल क्लिपमध्ये एक व्यक्ती एका कंटेनरमध्ये पीठ, साखर, मीठ आणि इतर घटक मिसळताना दिसत आहे. मग, ते पीठ तयार करण्यासाठी मशीनमध्ये टाकतात. पीठ तयार झाल्यावर ते साच्यात टाकले जाते आणि शेवटी ब्रेड बेक केला जातो. नंतर तयार ब्रेड काढून एका चटईवर ठेवला जातो. एवढेच नव्हेतर बेकरीतील एकाही एकाही कामगाराने हातमोजे घातले नाहीत.

Viral Video: धावत्या बसमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, खिडकीची काच लावण्यावरून पेटला वाद!

ही पोस्ट काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला जवळपास एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला दोन हजारांहून अधिक लाईक्स आणि असंख्य कमेंट्स देखील मिळाल्या आहेत. क्लिप पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले आहे की, उद्यापासून ब्रेड खाणे बंद,  दुसऱ्याने लिहिले आहे की, ब्रेड तयार करताना स्वच्छता ठेवली जात नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर