Viral Video: धावत्या कारमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे; लहान मुलांनी चुकूनही पाहू नये 'हा' व्हिडिओ!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: धावत्या कारमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे; लहान मुलांनी चुकूनही पाहू नये 'हा' व्हिडिओ!

Viral Video: धावत्या कारमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे; लहान मुलांनी चुकूनही पाहू नये 'हा' व्हिडिओ!

Published Jul 18, 2024 03:01 PM IST

Nagpur man kissing girlfriend while drives car: नागपूर येथे धावत्या कारमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

नागपूरमध्ये धावत्या कारमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे
नागपूरमध्ये धावत्या कारमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे

Nagpur Couple Kissing in Car: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. नागपूर येथील अशाच एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओत एक तरुण चक्क धावत्या कारमध्ये आपल्या गर्लफ्रेन्डशी अश्लील चाळे करताना दिसत आहे. एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात टाकणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी संबंधित तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण कार चालवत आहे. तरुणी त्याच्या मांडीवर बसली असून त्याचे चुंबन घेत आहे. या जोडप्याचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अशा कृत्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. यापुढे कधीच असा प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. पुणे, मुंबईमध्ये घडलेल्या हीट अँड रनच्या घटनेनंतर हा व्हिडिओ समोर आल्याने नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओतील जोडप्याचे वय २८ वर्षे आहे. तरुण चार्टर्ड अकाउंटंट आहे तर महिला इंजिनिअर आहे. या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस आणि मुंबई पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या शंकर नगर येथील लॉ कॉलेज चौकातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.

कल्याण: बीएमडब्लू कारवर बसून स्टंटबाजी

याआधी कल्याण येथे एका तरुणाचा बीएमडब्लू कारवर बसून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर बाजापेठ पोलिसांनी तरुणाला अटक केली. शुभम मितालिया असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अल्पवयीन मुलगा ही चालवित आहे. त्याच्या वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मुंबई वाहतूक पोलिसांनी मे महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २,२६३ वाहनचालकांविरोधात कारवाई केली. विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, सिग्नल मोडणे, भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहतुकीतून प्रवासी वाहतूक करणे, प्रवासी वाहनातून मालवाहतूक करणे, भाडे नाकारणे अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर