Viral Video: कोणी तरी काही तरी द्या; कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, व्हिडिओ व्हायरल!-viral video influencer dresses up as spider man to beg for money in mumbai ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: कोणी तरी काही तरी द्या; कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: कोणी तरी काही तरी द्या; कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, व्हिडिओ व्हायरल!

Sep 24, 2024 03:08 PM IST

Spider Man Viral Video: कल्याण रेल्वेस्थानकावर भीक मागणाऱ्या स्पायडरमॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कल्याण रेल्वेस्थानकावर भीक मागणाऱ्या स्पायडरमॅनचा व्हिडिओ
कल्याण रेल्वेस्थानकावर भीक मागणाऱ्या स्पायडरमॅनचा व्हिडिओ (Instagram/@shaddyman98)

Kalyan Railway Station Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच काय तरी नवी पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. लहानपणापासून थोरांपर्यंत सर्वांचा आवडता सुपरहिरो स्पायडरमॅन चक्क कल्याणस्थानकात भीक मागताना दिसतोय. स्पायडरमॅनच्या वेशभूषेत असलेला व्यक्ती सोशल मीडिया इंफ्लुएंसर असल्याचे बोलले जात आहे. अनेकांना हा व्हिडिओ मनोरंजक वाटला आहे. तर, काहींनी सार्वजनिक ठिकाणी असे दृश्य सादर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

व्हिडिओत दिसत आहे की, स्पायडरमॅनच्या वेशभूषेत एक व्यक्ती कल्याण रेल्वेस्थानकाबाहेर भीक मागताना दिसत आहे. स्पायडरच्या वेशात असलेल्या व्यक्तीची मदत करण्यासाठी एक व्यक्ती समोर येतो आणि त्याच्या हातात पैसे ठेवतो. मात्र, हा भीक मागण्याचा प्रकार खराखुरा नसून फक्त एका रीलसाठी करण्यात आला. भीक मागणारा व्यक्ती सोशल मीडिया इंफ्लुएंसर असून आपल्या चाहत्याच्या मनोरंजनासाठी त्याने हा स्टंट केल्याचे बोलले जात आहे. रेल्वे प्रवाशांचे लक्ष वेधून घेणे हा व्हिडिओमागचा उद्देश आहे.

व्हिडिओला २.८ मिलयन व्ह्यूज

@shaddyman98 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, या व्हिडीओतील स्पायडरमॅनला कोणी तरी काही तरी द्या, असे म्हटले आहे. या व्हिडीओला तब्बल २.८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर, एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

स्पायडरमॅनच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने अशी कमेंट केली आहे की, स्पायडरमॅन आधारवाडीपासून फार दूर नाही. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, परदेशात स्पायडरमॅन खूप महत्त्व आहे, जे भारतात नाही. आणखी एका युजरने लिहिली आहे की, सोशल मीडिया इंफ्लुएंसर त्यांचे सब्सक्रायबर वाढण्यासाठी कोणत्या थराला जातील, काही सांगता येत नाही. दरम्यान, अनेकांना हा व्हिडिओ आवडला आहे. तर, बऱ्याच लोकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या स्पायडरमॅनला अटक

याआधीही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका स्पायडरमॅनला पोलिसांनी अटक केली. व्हायरल व्हिडिओ स्पायडरमॅनच्या वेशभूषेत असलेल्या एक व्यक्ती कारच्या बोनेटवर बसून प्रवास करताना दिसला. यानंतर पोलिसांनी कारचालकासह संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई केली.

Whats_app_banner
विभाग