Viral Video: भारतीय महिलेनं कोरियन नवऱ्याची घेतली हिंदीची टेस्ट, चप्पलला काय म्हणाला बघा, हसून- हसून दुखेल पोट!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: भारतीय महिलेनं कोरियन नवऱ्याची घेतली हिंदीची टेस्ट, चप्पलला काय म्हणाला बघा, हसून- हसून दुखेल पोट!

Viral Video: भारतीय महिलेनं कोरियन नवऱ्याची घेतली हिंदीची टेस्ट, चप्पलला काय म्हणाला बघा, हसून- हसून दुखेल पोट!

Dec 02, 2024 01:37 PM IST

कोरियन पतीची हिंदीची टेस्ट घेणाऱ्या भारतीय महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ: भारतीय महिलेनं कोरियन नवऱ्याची घेतली हिंदीची क्लास
व्हायरल व्हिडिओ: भारतीय महिलेनं कोरियन नवऱ्याची घेतली हिंदीची क्लास

Viral News: भारतीय कंटेंट क्रिएटर नेहा अरोरा आणि तिचा कोरियन पती जोंगसू ली यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे. या व्हिडिओत संबंधित महिला आपल्या पतीचे हिंदीची क्लास घेते. या दाम्पत्याचा ‘के-ड्रामा विथ अ इंडियन ट्विस्ट’ हा व्हिडिओला मोठी पसंती मिळाली आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये नेहा ही जोंगसू लीचे हिंदी कौशल्य तपासण्यासाठी जवळ बोलावून घेते आणि त्याला विविध वस्तूंचे फोटो दाखवते. तसेच या वस्तूंना हिंदीत काय बोलतात? असे  जोंगसू ली याला विचारते. सुरुवातीला नेहा ही जोंगसू ली याला चमच्याचा फोटो दाखवते.  हा फोटो पाहिल्यानंतर तो लगेच ‘चम्मच’ असे बोलतो. यानंतर नेहा त्याला चप्पलचा फोटो दाखवते. चप्पलला हिंदीत काय बोलतात, याचे जोंगसू ली याने दिलेले उत्तर ऐकून अनेकांना हसू आवरणार नाही. कारण, तो आत्मविश्वासाने म्हणतो की, ‘ये बिलकुल आसान, थप्पड!’. त्याच्या अनपेक्षित आणि गंमतीशीर उत्तराने नेहा जोरजोरात हसते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले आहे की, 'ओएमजी त्याला 'उपर पंखा चलता है, नीचाय बेबी सोता है' हे देखील माहित होते. लीच्या विचित्र हिंदी वाक्ये उच्चारण्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. आणखी एका युजरने लिहिले की, "हाहाहा जिजूला सर्व काही माहित आहे," लीचा उल्लेख ‘जिजू’ म्हणजेच मेहुणा म्हणून केला आणि त्याच्या विनोदी प्रतिक्रियांवर हसत आहे. या पोस्टला ८३ हजार ८५४ लाईक्स मिळाले आहेत.

एका व्यक्तीने कमेंट केली, ‘थप्पडसोबत चप्पल अप्रतिम होते,’ लीच्या मजेशीर मिक्सअपचे कौतुक केले. अनेकांनी हे जोडपे किती गंमतीशीर आहे, हे व्यक्त केले. या व्हिडिओमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेल्या प्रेमाचं आणि आपुलकीचं प्रतिबिंब उमटले. देवा, या जोडप्याला आशीर्वाद दे', अशी अनेकांनी कमेंट केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर