Viral Video: मुलींची दादागिरी! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून मारलं, व्हिडिओ व्हायरल-viral video female school student abused brutally thrashed by group of girls in versova yari road ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: मुलींची दादागिरी! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून मारलं, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: मुलींची दादागिरी! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून मारलं, व्हिडिओ व्हायरल

Aug 25, 2024 10:22 AM IST

Versova Girls Beats School Student: वर्सोव्यातील यारी रोड येथे शाळेकरी मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वर्सोव्यात मुलींकडून विद्यार्थिनीला मारहाण
वर्सोव्यात मुलींकडून विद्यार्थिनीला मारहाण

Viral News: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुलींच्या एका टोळीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. वर्सोव्यातील यारी रोड परिसरात हा प्रकार घडला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. पीडित मुलीला मारहाण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

कार्यकर्त्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, मुंबईतील यारी रोड येथील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मुलींच्या टोळीने बेदम मारहाण केली.' तसेच याप्रकरणी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याची त्यांनी विनंती केली आहे. व्हिडिओत तीन मुली शाळेचा गणवेश घातलेल्या मुलीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. पीडित मुलगी कशीतरी स्वतःची सुटका करून घेते आणि आपल्या मैत्रिणीजवळ पोहोचते. मात्र, त्यानंतरही या मुली पीडिताला पकडून बेदम मारहाण आणि शिवीगाळ करतात.

विद्यार्थिनीला मारहाण करत असताना कोणीही तिला वाचवण्यासाठी येत नाही. मुलींसोबत काही मुलांनीही आपल्या मित्रांना थांबवण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेतली. मात्र, काही वाटसरूंनी हस्तक्षेप करून या मुलींना रोखले. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? हे अद्याप समजू शकले नाही. परंतु, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, या मुलींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, ज्यांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीला मारहाण केली. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, बाजूला उभे असलेले तरुण त्यांना अडवण्याऐवजी भांडणाचा आनंद घेत आहेत, हे लज्जास्पद आहे. आणखी एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, पोलिसांत तक्रार करून काहीही फायदा होणार नाही, ते त्यांच्याकडून ३०० शब्दांचा निबंध लिहून घेतील आणि त्यांना सोडून देतील.

विभाग