Viral Video: काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई, मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवतानाचा व्हिडिओ समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई, मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवतानाचा व्हिडिओ समोर

Viral Video: काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई, मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवतानाचा व्हिडिओ समोर

Nov 02, 2024 09:44 PM IST

Yunus Chaudhary Viral Video: बागपत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युनूस चौधरी यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Yunus Chaudhary News: यूपीच्या बागपत जिल्ह्यातून एका काँग्रेस नेत्याचे लज्जास्पद कृत्य समोर आले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एका मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवताना आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस हायकमांडने युनूस चौधरी यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना पदावरून हटवले.

काँग्रेस शहराध्यक्ष राकेश शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, जिल्हाध्यक्षांच्या अशा कृत्यांची राज्य संघटनेने गांभीर्याने दखल घेतली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. युनूस चौधरी यांनी पक्षाची प्रतिमा मलीन केल्याने त्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तर, दुसरीकडे जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आलेले डॉ. युनूस चौधरी यांनी राजकीय षडयंत्रांतर्गत व्हिडिओ एडिट करून आपली बदनामी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते मुलीशी अश्लील भाषेत बोलत असून आपला प्रायव्हेट पार्ट दाखवत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, खोलीत एक मुलगी उभी आहे. तर, दुसरीकडे युनूस चौधरी आपल्या दालनात आहेत. युनूस चौधरी संबंधित मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओतील मुलगी हे चुकीचे असल्याचे सांगताना दिसत आहे. माझी आई आली तर ती मला मारून टाकेल, असे ती बोलत आहे. तरी युनूस चौधरी तिला इकडे ये असे म्हणतात. यानंतर ती मुलगी पुन्हा म्हणते की, यार प्लीज आत्ता नको. युनूस चौधरी वारंवार मुलीला आपल्या खोलीत बोलावताना दिसत आहेत. त्यानंतर ती मुलगी युनूस चौधरी यांच्याकडे जाते. मुलगी खोलीत पोहोचताच युनूस चौधरी तिला पकडतात आणि मग अश्लील कृत्य करण्यास सुरुवात करतात. जिल्हाध्यक्षांच्या या लाजिरवाण्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच विविध चर्चांना उधाण आले आहेत.

सात वर्षाच्या मुलीला दुकानात बोलवून अश्लील कृत्य

उत्तर प्रदेशातील बदायूं मध्ये एका व्यक्तीने एका सात वर्षांच्या मुलीला दुकानात बोलवून तिचे अश्लील फोटो काढले. ही घटना सदर कोतवाली परिसरातील आहे. एक महिला आपली सात वर्षाची भाचीसोबत औषधे घेण्यासाठी मेडिकल गेली. शाहिद नावाचा एक तरुण मेडिकल दुकानाजवळ सलून चालवतो. महिला मेडिकलमध्ये असताना शाहिदने सात वर्षांच्या मुलीला तिचे नाव विचारले. त्यानंतर त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. तसेच तिचे अश्लील फोटोही काढले. कसेबसे तिथून बाहेर पडून मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. यानंतर पीडिताच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर