Viral Video: मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर ऑटो चालकांची तरुणाला शिवीगाळ आणि बेदम मारहाण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर ऑटो चालकांची तरुणाला शिवीगाळ आणि बेदम मारहाण

Viral Video: मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर ऑटो चालकांची तरुणाला शिवीगाळ आणि बेदम मारहाण

Updated Aug 11, 2024 10:27 AM IST

Mankhurd Auto Drivers Abused Youth: मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर ऑटो चालकांची तरुणाला शिवीगाळ आणि बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर ऑटो चालकांची तरुणाला मारहाण
मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर ऑटो चालकांची तरुणाला मारहाण

Viral News: मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेरील ऑटोरिक्षा स्टँडवर रिक्षाचालकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण प्रकार स्थानिक लोकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून लवकरच दोषींविरोधात कारवाई करण्याचे अश्वासन दिले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही रिक्षाचालक एका तरुणाला शिवीगाळ आणि लाथाबुक्यांसह पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहेत. संबंधित तरुणाच्या उद्धट वागणुकीमुळे रिक्षाचालकांनी त्याला मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या घटनेमागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओची मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून याप्रकरणी योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एक्स प्लॅटफॉर्मवरील गोवंडी सिटिझन्स वेलफेअर फोरम या खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यानंतर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने वायरल झाला. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. एकाने असे म्हटले की शहरात रिक्षा माफियांची वाढ होऊ लागली असून त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मानखुर्द आणि गोवंडीसारखी ठिकाण मुंबईचा भाग आहे, यावर विश्वास बसत नाही. आणखी एका युजरने म्हटले आहे की, गोवंडी आणि मानखुर्दसारख्या परिसरात अशा घटना नेहमीच घडत असतात.

मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल अन्सारी असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अकील युनूस असे रिक्षाचालकाचे नाव आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर सोहेल आणि अकील युनूस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर दोघांमधील वाद शिगेला पोहोचला आणि युनूसने सोहेलला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर इतर दोन रिक्षा चालकांनीही सोहेलला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली. याप्रकरणी मानखुर्द पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर