मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: स्टंटबाजी जीवावर बेतली; भरधाव कार ट्रकवर आदळल्यानं दोघांचा मृत्यू, एक जखमी

Viral Video: स्टंटबाजी जीवावर बेतली; भरधाव कार ट्रकवर आदळल्यानं दोघांचा मृत्यू, एक जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 23, 2024 11:55 AM IST

Car-Truck Accident Video: व्हिडिओमध्ये भरधाव कार पार्किंगमधील ट्रकला जोरात धडकल्याचे दिसत आहे.

Car Accident
Car Accident

स्टंटबाजी करताना भरधाव कार पार्किंगमधील ट्रकला धडकल्याची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण जखमी झाले. मृतांमध्ये एका १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. ही घटना रविवारी (२१ जानेवारी) रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची क्रिसलर ३०० कार एका मोठ्या रंगाच्या ट्रकवर जाऊन आदळली. ही घटना न्यूयार्कच्या ट्रक ब्रायंट आणि व्हिएल एव्हेन्यूच्या चौकाजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की, क्रिसलर कारचा चक्काचूर झाला.

गिल्व्हांटे रोबर्सन (वय, २१) आणि  सबरीना विलागोमेझ (वय, १५) अशी मृतांची नावे आहेत.  गिल्व्हांटे रोबर्सन ड्राव्हरच्या बाजूच्या सीटवर बसली होती. तर, सबरीना आणि १७ वर्षीय मुलगी पाठीमागे बसल्या होत्या. १७ वर्षीय मुलीला गंभीर अवस्थेत सेंट बर्नबास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, ड्रायव्हरला हार्लेम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्या वेगात कार ट्रकला धडकली, हे पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. वाहनधारकांना वारंवार वाहन सावकाश चालवण्याचे आवाहन केले जाते. मात्र, तरीही अनेकजण अशी स्टंटबाजी करत स्वत: सह अनेकांचा जीव धोक्यात घालतात.

WhatsApp channel