पोलिस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली तर त्यांना धक्का बसला. हा कुठल्या तरुणीचा मृतदेह नव्हता. तर टी महागडी सेक्स डॉल असल्याचं निष्पन्न झालं. यामुळे उपस्थित सर्वांनीच डोक्यावर हात मारून घेतला. दरम्यान, ही सेक्स डॉल समुद्र किनाऱ्यावर कुणी फेकली याचा शोध पोलिस घेत आहे. तर ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
या संपूर्ण घटनेबद्दल तरानाकी येथील रहिवासी एलिस काउड्रे हिने संपूर्ण माहिती दिली आहे. ती तिच्या पाळीव कुत्र्या सॅडीसोबत बीचवर वेळ घालवत होती. समुद्र किनारी फिरत असतांना तिची नजर अचानक एका नग्न 'मृतदेहावर'वर पडली. या मृतदेहाला डोकं नव्हतं. तर शरीरावर कोणत्याही प्रकरच्या जखमांच्या खुणा नव्हत्या. डोकं नसलेला हा मृतदेह पाहून ॲलिस घाबरली. तिने आरडा ओरडा करत स्थानिक पोलिसांना यांची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत कारवाई केली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. महिलेने जो मृतदेह पाहिला तो मृतदेह नव्हताच. समुद्र किनारी पडलेला ती गोष्ट म्हणजे सेक्स डॉल होती. सत्य समोर आल्यावर सर्वांनी डोक्यावर हात मारून घेतला. या डॉलला डोकं नसलं तरी तिचे संपूर्ण शरीर हे हुबेहूब एका महिलेसारखे दिसत होते. ही डॉल समुद्रकिनाऱ्यावर अशीच पडून होती. पोलिसांनी सांगितले की, ही डॉल समुद्रकिनाऱ्यावर बराच वेळ पडून होती, समुद्राच्या लाटा आणि वाळूमुळे ती खराब झाली होती.
ॲलिसच्या महितीनंतर व पोलिसांनी केलेल्या तपासणी नंतर ही बाहुली समुद्रकिनार्यावरून काढण्यात आली. मात्र, ही बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, "ही बाहुली खूप महागडी असावी. एवढ्या महागड्या वस्तू अशा समुद्रकिनाऱ्यावर कोण सोडणार?"