Vikroli crime : विक्रोळी येथे एक किरकोळ अपघात झाला आहे. या आपघतात गाडीचे नुकसान झाल्याने त्याची भरपाई घेण्यासाठी ओला कॅबचालकाने एका पती-पत्नीचा पाठलाग करून त्यांना गाठले. मात्र, भरपाई देण्याऐवजी पती पत्नीने ओला कॅब चालकाला गंभीर मारहाण केली आहे. या मारहाणीत ओला कॅबचालक हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कारचालक पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कड़मुद्दीन मैनुद्दीन कुरेशी असे जखमी कॅबचलकाचे नाव आहे. तर कारचालक क्रषभ चक्रवर्ती आणि त्याची पत्नी अंतरा चक्रवर्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घाटकोपर एलबीएस रोड येथील वाधवा इमारतीच्या खाली १८ ऑगस्टला रात्री उशीरा घडली आणि बुधवारी ती उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती अशी की, विक्रोळी येथे कार चालकाने ओला चालकाच्या गाडीला धडक दिली. यात गाडीचे नुकसान झाल्याने भरपाई घेण्यासाठी ओला चालकाने खासगी कार चालकाचा पाठलाग केला. या घटनेत ओला चालकाचा गाडीचा खासगी कार मालकाच्या गाडीला घासली. यामुळे कार मालक पती पत्नीने ओला कॅबचालकाला गंभीर मारहाण केली. या मारहाणीत कॅबचलकाला जमिनीवर आपटले. या घटनेत कॅब चालक हा जखमी झाला आहे. त्याचा हात तुटला आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाले आहे. ओला चालक कड़मुद्दीन मैनुद्दीन कुरेशी (वय २४) हा गोवंडी शिवाजीनगर भागात राहत असून तो १८ ऑगस्टला विक्रोळी येथे जात होता. यावेळी आरोपीच्या गाडीने ओला चालकाच्या गाडीला धडक दिली. यामुळे कॅब चालकाने त्यांचा पाठलाग केला. यात कार चलाकाच्या गाडीचे देखील किरकोळ धडक लागल्याने त्यांनी कार चालकाला मारहाण केली. यावेळी कॅब चालक मदतीसाठी ओरडत होता. पण, त्याच्या मदतीला कुणीही आले नाही. या मारहाणीत कॅब चालक गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला घाटकोपर एलबीएस रोड येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.