Vikhroli Accident : विक्रोळीत भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू-vikhroli accident rohit nikam and siddharth dhage died in car accident on eastern express highway ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vikhroli Accident : विक्रोळीत भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू

Vikhroli Accident : विक्रोळीत भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू

Aug 23, 2024 09:31 AM IST

Vikhroli Accident: भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीजवळ गुरुवारी रात्री घडली.

विक्रोळीत भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू
विक्रोळीत भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू

Vikhroli Accident: मुंबईतील विक्रोळी येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे. दोन मित्र कारने जात होते. त्यांच्या गाडीचा वेग जास्त असल्याने व गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली. या घटनेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीजवळ गुरुवारी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. 

रोहित भाऊसाहेब निकम व सिद्धार्थ राजेश ढगे अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन मित्रांची नावे आहेत. ही दोघे त्यांच्या कारने पूर्व द्रुतगती मार्गावरुन भरधाव वेगात जात होते. यावेळी हा अपघात झाला. घटनेत गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित व सिद्धार्थ हे दोघे गुरुवारी रात्री १२.३० च्या सुमारास विक्रोळी येथे जात होते. मध्यरात्री रोहितची कार सिद्धार्थने चालवण्यासाठी घेतली. हे दोघेही पूर्व द्रुतगती मार्गावरुन जात होते. यावेळी त्यांच्या गाडीचा वेग जास्त होता. याच वेगामुळे सिद्धार्थचे कारवरील नियंत्रण सुटले व कार पदपथावरील झाडाला जोरदार धडकली. ही धडक इतकी जोरात होती की कार द्रुतगती मार्गावर पलटली. यात कारचा चक्काचूर झाला. दोघेही गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिस घटनास्थळी जात त्यांनी जखमी दोघांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषीत केले.

दोघेही जिवलग मित्र

सिद्धार्थ व रोहित हे जीवलग मित्र होते. ते दोघे काही कामानिमित बाहेर गेले होते. परत येत असतांना वेगाने त्यांच्या घात केला. गाडीचा वेग जर नियंत्रणात असता तर दोघांचा जीव वाचू शकला असता. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तसेच विक्रोळी परिसरात देखील शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

अपघाताचे प्रमाण वाढले

राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विक्रोळी द्रुतगती मार्गावर देखील या घटना वाढल्या आहेत. नागरिक वाहतूक नियम पाळत नसल्याने या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी कठोर नियमांची गरज असल्याच मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

 

विभाग