Vijay Wadettiwar On Maharashtra Government: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवारपासून (७ डिसेंबर २०२३) पासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या एकूण दिवस १४ दिवसांत ४ दिवस सु्ट्ट्या असणार आहेत. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला बोट दाखवले आहे. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. अवघ्या १० दिवसांत राज्यातील प्रश्न सुटणार नाहीत, विधानसभेच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी विनंती विजय वडेट्टीवार यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, "नागपूरला होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर चर्चा झाली. आम्ही विरोधी पक्ष म्हणून हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्याची मागणी केली होती. पण त्यांनी फक्त दहा दिवस काम ठेवले. पण दहा दिवसांत एकही प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. चर्चेसाठी दहा दिवस पुरेसे नाहीत. विरोधी पक्ष म्हणून विधानसभेच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा ही आमची विनंती आहे."
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनाच्या वेळापत्रकानुसार चार दिवस सुट्टी आणि दहा दिवसांचे कामकाज असे दोन आठवड्यांत अधिवेशन पार पडणार आहे. म्हणजेच, फक्त १० दिवसांचे हिवाळी अधिवेशन होणार आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनच्या कालावधीवरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "राज्यातील शेतकरी, मजूर, बेरोजगारी, युवक, प्रत्येक घटकातील सर्वांना न्याय देण्यासाठी किमान तीन आठवडे अधिवेशन घ्यायला हवे. सल्लागार समितीत त्यावर अंतिम निर्णय होईल. परंतु, राज्य सरकारने दहा दिवसांत अधिवेशन गुंडाळू नये, असेही दानवे म्हणाले.
संबंधित बातम्या