महाराष्ट्र विधानसभानिवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना राज्यातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार चांगलेच ऍक्टिव्ह झाले असून अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यातच राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारत राष्ट्र समिती राज्य शाळा विलीन होणार आहे.
येत्या ६ ऑक्टोबरला हजारोंच्या संख्येने पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस हा पक्ष विलीनहोण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण बीआरएस कार्यकारिणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करतील. बीआरएसचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राजकीय ताकद वाढणार आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार होणार आहे. राज्यातील बीआरएसचे सर्व पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. येत्या ६ तारखेला पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत बीआरएसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. राज्यातील बीआरएस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांसोबत बैठक पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीभेट घेतली. बीआरएसची प्रदेश कार्यकारिणी शरद पवार यांना साथ देऊन त्यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करणारआहे.
बीआरएसची राज्य शाखा शरद पवार गटात सामील झाल्यास मराठवाडा भागात महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे. याचा फटका महायुतीला बसू शकतो. दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठा विजय मिळवत बीआरएसचा दारुण पराभव केला होता.
लोकसभा निवडणुकीच्या आधी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेकडो गाड्यांचा ताफा हैदराबादहून पुंढरपुरात आणत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यांच्या हस्ते नागपुरातील शाखेचे केसीआर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर काहींनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला होता. मात्र केसीआर यांना विधानसभेआधीच गाशा गुंडाळावा लागणार आहे.