मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Breaking: भाजप-राष्ट्रवादीला फटका.. रामराजे, खापरेंच्या कोट्यातील १-१ मत बाद

Breaking: भाजप-राष्ट्रवादीला फटका.. रामराजे, खापरेंच्या कोट्यातील १-१ मत बाद

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 20, 2022 09:12 PM IST

राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आले आहे.

भाजप-राष्ट्रवादीला फटका..
भाजप-राष्ट्रवादीला फटका..

मुंबई -राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या कोट्यासाठी आता२५.७१चा नवा कोटा ठवण्यात आला आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. यात २८५ आमदारांनी मतदान केले. छाननीत ही सर्व मते वैध ठरवण्यात आली. परंतु त्यानंतर भाजप नेतेआशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या मतपत्रिकेवर हा आक्षेप आहे. तिसऱ्या क्रमांकाचे मत देताना ओव्हर रायटिंग करण्यात आल्याने हा आक्षेप घेतला आहे.

या आक्षेपावरून भाजपा-मविआ यांच्यात वाद झाला. २८५ मतांची छाननी पूर्ण झाली त्याचवेळी एका मतपत्रिकेवर तिसऱ्या पसंतीचे मत देताना ओव्हर रायटिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. जेणेकरून हे मत कुणी दिले हे कळून येईल असं भाजपा नेते शेलारांचा आक्षेप आहे. परंतु शेलारांच्या आक्षेपाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे मतमोजणीला पुन्हा विलंब झाला. भाजपाच्या आक्षेपानंतर रामराजे कोट्यातलं ते मत बाजूला काढलं आहे. त्यानंतर मविआनेही भाजपा उमेदवार उमा खापरे यांच्या एका मतावर आक्षेप घेतला. त्यानंतर ही दोन्ही मते बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मतदान झाल्यानंतर काँग्रेसकडून आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आलेहोते.या दोन्ही आमदारांच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीला सहकार्यासाठी मतदानासाठी घेतले. हे दोन्ही आमदार सही करू शकत होते, मग मतदानाला दुसऱ्याला का पाठवले? यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेपघेण्यात आला होता. मात्र निवडणूक आयोगाने काँग्रेसने आरोप फेटाळून लावले. यामुळे मतमोजणीला २ तास विलंब झाला.

राज्याच्याविधान परिषदेच्या १०जागांचीनिवडणूक आज होत असूनदहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणेभाजपचमत्कार घडवणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतविजयाचा गुलाल कोण उधळणार हेथोड्यात वेळात समजणार आहे.शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपकडूनप्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपले नशिब आजमावत आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या