MLC Election result 2024 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाची बाजी; सर्व जागांचे निकाल जाहीर, महायुतीला पुन्हा दणका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election result 2024 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाची बाजी; सर्व जागांचे निकाल जाहीर, महायुतीला पुन्हा दणका

MLC Election result 2024 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाची बाजी; सर्व जागांचे निकाल जाहीर, महायुतीला पुन्हा दणका

Updated Jul 01, 2024 11:32 PM IST

Vidhan parishad election result 2024 : मुंबईतील दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या असून महायुतीला पराभव सहन करावा लागला आहे.नाशिक शिक्षक मतदारसंघातही ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे आघाडीवर आहेत.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाची बाजी
पदवीधर, शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाची बाजी

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. दोन्ही मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. पदवीधर मतदारसंघातून उध्दव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी २६ हजार २० मतांनी विजय मिळवला आहे तर शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांनीही निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे. मुंबईतील दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या असून महायुतीला पराभव सहन करावा लागला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातही ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांचाही विजय जळवपास निश्चित मानला जात आहे.

दरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने विजयाचा गुलाल उघळला असून येथे भाजपचे निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

निरंजन डावखरे यांनी यांना मतमोजणीच्या ४ पैकी पहिल्या दोन फेऱ्यांतच तब्बल ३५ हजार मते पडली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रमेश कीर यांना केवळ ७ हजार मते मिळाली होती. मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्या संपल्या असून डावखरे यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा २६ हजाराहून अधिक मतांनी विजय झाला. अनिल परब हे २०१२ आणि २०१८ मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेवर संधी दिली आहे. 

नेमकी लढत कुणाकुणामध्ये झाली व विजयी कोण ?
 

  • कोकण पदवीधर – निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध रमेश कीर ( काँग्रेस) यामध्ये निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला.
     
  • मुंबई पदवीधर – किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब ( ठाकरे गट) यात ठाकरे गटाचे अनिल परब यांनी विजय मिळवला. 
     
  • मुंबई शिक्षक मतदारसंघ – शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर (मविआ), सुभाष मोरे ( शिक्षक भारती). यात ठाकरे गटाचे अभ्यंकर यांनी बाजी मारली आहे.
     
  • नाशिक शिक्षक मतदारसंघ – किशोर दराडे (शिंदे गट) विरुद्ध संदीप गुळवे (ठाकरे गट). अटीतटीच्या लढतीत गुळवे यांनी आघाडी मिळवली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या