Vidhan Parishad Election: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यावर राज्यात विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. तर निकाल १ जुलै रोजी लागणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. शुक्रवारी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने या संदर्भात एक पत्र काढून दोन उमेदवारांची नावे घोषित केली आहे.
सध्या देशात लोकसभा निवडणुकी धामधूम सुरू आहे. ४ जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान, ही निवडणूक झाल्यावर राज्यात शिक्षक मतदार संघ आणि विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. या साठी ठाकरे गटाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत आतापासून वाढणार आहे.
अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते आहेत. सध्या ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी काम सांभाळले आहे. तर रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहेत. परब यांना २०१२ ते २०१८ मध्ये विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आता पुन्हा उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
तर, ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष असून शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर तसेच शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला आहे. तसेच आंदोलन देखील त्यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष पद देखील त्यांनी सांभाळले आहे. त्यानंतर त्यांना शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका १० जून रोजी घोषित करण्यात अळ्या होत्या. मात्र, मे महिन्याच्या सुट्टीसाठी अनेक शिक्षक गावी गेल्याने निवडणूक घेणे उचित ठरणार नाही असे म्हणून या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. त्यानुसार निवडणुकांच्या तारखा नव्याने घोषित करण्यात आल्या होत्या.
या निवडणूका ३६ जूनला होणार आहे. २६ तारखेला विधानपरिषद निवडणुकीचे मतदान होणार असून १ जुलै रौजी निकाल जाहीर केला जाणार आहे. दोन पदवीधर व दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांना ३१ मे ते ७ जून या काळात उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर १० जूनपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर १२ जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे.
संबंधित बातम्या