मुंबई, कोकणातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात! अशी होणार मतमोजणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई, कोकणातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात! अशी होणार मतमोजणी

मुंबई, कोकणातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात! अशी होणार मतमोजणी

Jul 01, 2024 11:04 AM IST

Vidhan Parishad Election counting : विधान परिषद आणि पदवीधर मतदार संघासाठीच्या मतमोजणीस सुरूवात झाली आहे. मुंबई पदवीधरमध्ये उद्धव गटाचे अनिल परब व भाजपचे किरण शेलार यांच्यात, तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे व काँग्रेसचे रमेश किर यांच्यात थेट लढत होत आहे.

मुंबई, कोकणातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात! अशी होणार मतमोजणी
मुंबई, कोकणातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात! अशी होणार मतमोजणी

Vidhan Parishad Election counting : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक व नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी आज सकाळी ८ पासून मतमोजणीस सुरूवात झाली आहे. या निवडणुकांसाठी २६ जूनला मतदान झाले होते. आज सकाळी ८ पासून मुंबईतील कोकण भवन इथे मुंबई, कोकण पदवीधर तर शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आहे, तर नाशिकसाठी नाशिक येथे मतमोजणीस सुरुवात झाली आहे. काही वेळात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

मुंबई पदवीधर मतदार संघात उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब व भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होणार आहे. तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे व काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात लढत होणार आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज.मो. अभ्यंकर हे निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे.

विधान परिषद आणि पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीस अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. शिक्षक आणि पदवीधर मतदानाच्या मतमोजत गैर प्रकार होऊशकतो असा आरोप ठाकरे गटाने केला असून या बाबत निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार केली होती.

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे या पूर्वी आमदार होते. आता सध्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात किरण शेलार हे रिंगणात आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीचे कपिल पाटील हे या पूर्वी आमदार होते. तर आता कपिल पाटील यांच्या ऐवजी सूभाष मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने ज. मो. अभ्यंकर हे रिंगणात आहेत. तर भाजपचे शिवनाथ दारडे हे तर शिवाजी शेंडगे हे शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार आहेत. तर शिवाजी नलावडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभे आहेत.

अशी होते निवडणूक

विधानपरिषद निवडणुकीची पद्धत विधान सभेच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. विधान परिषदेसाठी गुप्त पद्धतिने मतदान होते. या निवडणुकीत यामुळे क्रॉस वोटिंगची देखील शक्यता असते. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंती क्रम असतो. या पसंती क्रमानुसार मतदार मतदान करत असतात. मतदारसंघाची मतदारसंख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करून कोट्यानुसार प्रथम क्रमांकांची मते मिळवणारा उमेदवार हा विजयी घोषित केल्या जातो. जर पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसेल तर दुसऱ्या पसंतीची मते जो उमेदवार पूर्ण करेल तो उमेदवार विजयी घोषित केला जातो.

मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी

आज सकाळी मुंबई आणि नाशिक येथे विधान परिषद आणि पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू झाली असून दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते हे मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचले आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदानाच्या मतमोजणीवेळी गैर प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाचे नेते मतमोजणी केंद्रावर पोहोचले आहेत. मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार व ठाकरे गटाचे नेते अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सचिव मिलिंद नार्वेकर आदि उमेदवार, नेते, कार्यकर्ते हे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहे. थोड्याच वेळात कोण विजयी होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर