venugopal dhoot : प्रसिद्ध उद्योजक वेणुगोपाल धूत यांना अटक; ICICI कर्ज घोटाळ्यात सीबीआयची कारवाई
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  venugopal dhoot : प्रसिद्ध उद्योजक वेणुगोपाल धूत यांना अटक; ICICI कर्ज घोटाळ्यात सीबीआयची कारवाई

venugopal dhoot : प्रसिद्ध उद्योजक वेणुगोपाल धूत यांना अटक; ICICI कर्ज घोटाळ्यात सीबीआयची कारवाई

Updated Dec 26, 2022 12:26 PM IST

Videocon CEO Venugopal Dhoot : व्हिडिओकॉन कंपनीला बेकायदेशीररित्या कर्ज दिल्याप्रकरणी सीबीआयनं चंदा कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर आता थेट व्हिडिओकॉनच्या सीईओंना अटक करण्यात आली आहे.

Videocon CEO Venugopal Dhoot Arrested by CBI
Videocon CEO Venugopal Dhoot Arrested by CBI (HT)

Videocon CEO Venugopal Dhoot Arrested by CBI : व्हिडिओकॉन कंपनीचे सीईओ वेणुगोपाल धूत यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून बेकायदेशीर कर्ज घेत आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयनं कारवाई करत त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी याच प्रकरणात आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी चेरयन चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनाही सीबीआयनं अटक केली आहे.

आयसीआयसीआय बॅंकेची सूत्र कोचर यांच्या हाती असताना त्यांनी व्हिडिओकॉन कंपनीला बेकायदेशीररित्या ३२५० हजार कोटी रुपयांचं कर्ज दिल्याच्या प्रकरणात सीबीआयनं ही कारवाई केली आहे. कोचर यांनी धूत यांना बेकायदेशीर कर्ज देऊन त्यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिएन्यूबल कंपनीला धूत यांनी फंडिंग केलं होतं, असा आरोप सीबीआयनं केला आहे. त्यामुळं आता कोचर दाम्पत्यानंतर या प्रकरणात सीबीआयनं तिसऱ्या मोठ्या व्यक्तीला अटक केली आहे.

आयसीआयसीआय बॅंकेनं व्हिडिओकॉन कंपनीला २०१२ साली कर्ज दिलं होतं. त्यानंतर धूत यांनी हे कर्ज परत न केल्यामुळं बॅंकेनं हे कर्ज एनपीएमध्ये टाकलं होतं. याशिवाय आयसीआयसीआय बॅंकेनं कर्ज दिल्यानं व्हिडिओकॉन कंपनीनं सहा महिन्यांच्या आत दीपक कोचर यांच्या कंपनीला फंडिंग केलं होतं. त्यानंतर व्हिडिओकॉन आणि आयसीआयसीआय बॅंकेचे भागधारक अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरबीआय आणि सेबीला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. २०१८ साली या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बॅंकेच्या एमडीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याच वर्षी या प्रकरणात तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर