Viral News: छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत काही विद्यार्थिनींनी बीयर प्यायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून जबाब गोळा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या महितीनुसार, हा व्हिडिओ मस्तुरी परिसरातील भाटचौरा गावातील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील असून तो २९ जुलै रोजी शूट करण्यात आला आहे, असे समजत आहे. बिलासपूरचे जिल्हा शिक्षण अधिकारी टीआर साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुली बीयर आणि सॉफ्ट ड्रिंक्स पिताना दिसत आहेत. कथित घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या पथकाने सोमवारी संबंधित विद्यार्थी व शिक्षकांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान व्हिडिओतील विद्यार्थ्यांनी सांगितले की, ते फक्त मौजमजेसाठी कॅमेऱ्यात बीयरच्या बाटल्या फिरवत होते. परंतु, त्यांनी शाळेत मद्यपान केले नव्हते.
शाळांमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मुख्याध्यापक आणि संस्थाप्रमुखांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित मुलींच्या पालकांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, २९ जुलै रोजी काही मुलींनी आपल्या वर्गमित्राचा वाढदिवस वर्गात साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान त्यांनी बीयर प्यायली. या व्हायरल व्हिडिओला सोशल मीडियावर हजारो व्ह्यूज मिळाले आणि नेटकऱ्यांनी शाळेच्या आवारात ढिसाळ सुरक्षेबद्दल शाळा प्रशासन आणि शिक्षकांवर टीका केली.
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने आपल्या लाजिरवाण्या कृत्याने गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासला आहे. शिमला येथील एका सरकारी हायस्कूलमधील ड्रॉइंग टीचरने नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. मुलीने घरी जाऊन ही गोष्ट आईला सांगितली. यानंतर पीडित मुलीच्या आईने स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सोसह अन्य फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिची मुलगी सरकारी शाळेत शिकते. २ मे रोजी शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीने सांगितले की, शाळेचे ड्रॉइंग मास्टर योगेंद्र दुपारी ४ वाजता मुलीला वर्गात घेऊन गेला आणि तिल पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्या छातीलाही स्पर्श केला.