सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुण्यातील एका नामांकीत कंपनीच्या वॉक-इन मुलाखतीसाठी ३००० इंजिनियर्स रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. रांगेत उभे असलेले बहुतेक उमेदवार फ्रेशर्स होते. नोकरीच्या शोधात असलेल्या या फ्रेशर्सचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
अनेकवेळा कंपन्या तरुणांना संधी देण्यासाठी असे इव्हेंट करत असतात. पण मुलाखतीसाठी इतके लोक येतील, याचा अंदाज कोणालाच नसेल. तसेच, भारतात असे दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडीओ आश्चर्याचा धक्का देणारा होता.
या वॉक इन ड्राइव्हमध्ये २,९०० हून अधिक बायोडेटा जमा झाले होते. पुण्यातील हिंजवडी हे आयटी टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे युवा इंजिनियर नोकरीच्या आशेने आपली फाइल घेऊन रांगेत उभे असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
दरम्यान, आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतातील आयटी जॉब मार्केट आणि तरुण व्यावसायिकांसमोरील आव्हाने, या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच, अनेक तरुण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत
संबंधित बातम्या