Viral News: चालकाविना ८४ किलोमीटर धावली मालगाडी, अधिकाऱ्यांमध्ये घबराट; चौकशीचे आदेश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral News: चालकाविना ८४ किलोमीटर धावली मालगाडी, अधिकाऱ्यांमध्ये घबराट; चौकशीचे आदेश

Viral News: चालकाविना ८४ किलोमीटर धावली मालगाडी, अधिकाऱ्यांमध्ये घबराट; चौकशीचे आदेश

Feb 25, 2024 01:44 PM IST

Driverless Train Viral Video: जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली मालगाडी अचानक धावू लागल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ माजली.

Viral Video
Viral Video

Viral Video: जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने अचानक धावू लागली. धक्कादायक बाब म्हणजे, या मालगाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता. उतारामुळे ही मालगाडी ड्रायव्हरशिवाय धावत गेल्याची माहिती आहे. ही मालगाडी जवळपास ८४ किलोमीटरपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय धावत राहिली. यामुळे रेल्वे प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली.

खूप प्रयत्नांनंतर मालगाडी पंजाबच्या मुकेरियनमधील उन्ची बस्सीजवळ थांबवण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे जम्मूचे विभागीय वाहतूक व्यवस्थापक सांगतात. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी ७.१० च्या सुमारास घडली. चालकाने कठुआ, जम्मू येथे मालगाडी क्रमांक १४८०६ आर थांबवली होती. त्यानंतर चालक गाडीमधून खाली उतरून चहा प्यायला गेला. मात्र, काही वेळाने मालगाडी अचानक धावली आणि काहीच क्षणात मालगाडीचा वेग वाढला.

Mumbai News : गोरेगाव फिल्म सिटीजवळ भिंत कोसळून दोन कामगार जागीच ठार, एक गंभीर

कठुआ रेल्वे स्थानकाजवळील सूत्रांनी सांगितले की, मालगाडी काँक्रीट वाहून नेत होती. हे काँक्रीट कठुआ येथून मालगाडीत भरण्यात आले. चालक आणि सहचालक चहासाठी थांबले, तेव्हा इंजिन चालूच होते. यामुळे मालगाडी अचानक सुरू झाली. गाडीतून उतरण्यापूर्वी ड्रायव्हरने हँडब्रेक ओढला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

चालकाने गाडी सुरू झाल्याचे पाहिले आणि त्याला शॉकच बसला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक प्रयत्न अयशस्वी झाले. यानंतर दसुहाजवळील उची बस्ती परिसरात पॅसेंजर गाड्यांचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली. तोपर्यंत मालगाडी ८४ किलोमीटरपर्यंत धावली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर