Viral Video : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर द बर्निंग बसचा थरार! ३३ प्रवासी थोडक्यात बचावले; व्हिडिओ झाला व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर द बर्निंग बसचा थरार! ३३ प्रवासी थोडक्यात बचावले; व्हिडिओ झाला व्हायरल

Viral Video : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर द बर्निंग बसचा थरार! ३३ प्रवासी थोडक्यात बचावले; व्हिडिओ झाला व्हायरल

Published Oct 07, 2024 06:49 AM IST

old pune mumbai highway bus fire : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका खाजगी बसला अचानक आग लागली. या घटनेत ३३ प्रवासी सुदैवाने वाचले. ही घटना रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली.

 जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर द बर्निंग बसचा थरार! ३३ प्रवासी थोडक्यात बचावले; व्हिडिओ झाला व्हायरल
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर द बर्निंग बसचा थरार! ३३ प्रवासी थोडक्यात बचावले; व्हिडिओ झाला व्हायरल

old pune mumbai highway bus fire : पुण्यात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर एक भीषण घटना उघडकीस आली आहे. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली असून या आगीत ही बस संपूर्ण जळून खाक झाली आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली. या अपघातात ३३ प्रवासी थोडक्यात बचावले. बसच्या आगीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे घटना ?

मिळालेल्या माहितीनुसार एक खासगी बस ही प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस जुन्या मुंबई पुणे माहमार्गाने जात असतांना अचानक बसने पेट घेतला. ही बाब चलकांच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने बस रस्त्याच्या बाजूला घेत तातडीने बस मधील सर्व ३३ प्रवाशांना बसची खाली उतरवले. यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. आणि कशी क्षणात संपूर्ण बस ही भस्मसात झाली. ही आग नेमकी अशी लागली याची माहिती मिळू शकली नाही.

ही घटना रविवारी सातच्या सुमारास महामार्गावरील वाघजाई मंदिराकडून खाली उताराला घडली. घटनास्थळी तातडीने आय.आर.बी आणि अग्निशमन दल पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. परंतु, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेमुळे जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

दोन दिवसांपूर्वी कंटेनरला लागली होती आग

याच मार्गावर तळेगाव जवळ दोन दिवसांपूर्वी एका मोठ्या कंटेनरचा अपघात होऊन त्याला आग लागली होती. या घटनेत संपूर्ण कंटेनर जळून खाक झाला होता. तर चालकाचा जळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देखील या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी येत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर