मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: पोलिसांच्या कारमधील पेट्रोल संपलं, कैद्यांनी ५०० मीटरपर्यंत ढकलली गाडी, पाहा व्हिडिओ

Viral Video: पोलिसांच्या कारमधील पेट्रोल संपलं, कैद्यांनी ५०० मीटरपर्यंत ढकलली गाडी, पाहा व्हिडिओ

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 04, 2024 09:31 PM IST

Bihar Police Viral Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video

Bhagalpur Police Video Goes Viral: आरोपींना न्यायालयात घेऊन जाणारी महिंद्रा स्कॉर्पिओ कार पेट्रोल संपल्याने रस्त्यातच बंद पडली. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना कार ढकलण्यास लावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बिहारच्या भागलपूर येथील असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चारही आरोपींना दारूप्रकरणी अटक करण्यात आली. पोलीस या आरोपींना घेऊन न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होती. परंतु, कारमधील पेट्रोल संपल्याने पोलिसांची कार कचहारी चौकाजवळ बंद पडली. त्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना कारच्या खाली उतरून कार ढकलण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये चारही आरोपींना दोरीने बांधण्यात आल्याचे दिसत आहे. आरोपींनी ५०० मीटरपर्यंत कार ढकलल्याचे सांगितले जात आहे. रस्त्याने जात असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला.

पोलिसांच्या तावडीतून आरोपी पळून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बहुतांश आरोपी न्यायालयात हजर होत असताना पळून जातात. ही परिस्थिती चिंताजनक आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा या व्हिडिओवर कमेंट केल्या जात आहेत. पोलिसांची कार ढकलताना चारही आरोपी पळून जाऊ शकले असते, असेही एका व्यक्तीने म्हटले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे अश्वासन दिले. आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्या वाहनांची तपासणी केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

WhatsApp channel

विभाग