Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गॅंगचा राडा; वाहनांची तोडफोड; दहा वाहनांचे नुकसान
Pimpri-Chinchwad Crime : पुण्या पाठोपाठ पिंपरी-चिंचडव येथे देखील कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : पुण्या पाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड येथेही कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. काल रात्री तीन हल्लेखोरांनी हातात कोयते घेत येथील १० ते १२ वाहनांची तोडफोड केली. ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास चिखली येथील सरस्वती शाळेजवळ घडली.
ट्रेंडिंग न्यूज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात तीन जणांनी चिखलीतील सरस्वती शाळेजवळ पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यात वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी हवेत कोयते फिरवून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात शांतता नांदत होती. परंतु, पुन्हा तोडफोडीच्या घटनेने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे.
फिनिक्स मॉलमध्ये देखील दोन टोळक्यात वादावादी झाली होती. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी फरार असून आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. एका संशयित इसमाचे नाव पुढे येत असून, फिनिक्समधील मारहाण कोणी केली आणि कुठल्या मोठ्या टोळीचा सहभाग आहे, हे तपासात पुढे येईल, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.
विभाग