Vegetable Price Hike In Maharashtra : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. याशिवाय दिवाळी देखील काही दिवसांवर येवून ठेपल्याने अनेकांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. परंतु आता सामान्यांना सणासुदीत मोठा दणका देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रमुख मार्केट्समध्ये भाजीपाल्यांचे दर वाढले आहे. आवक कमी झाल्याने भाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता ऐन सणासुदीतच सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील मार्केटमध्ये फळांसह पालेभाज्यांच्या दरात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
नवरात्रोत्सव सुरू असल्याने आणि दिवाळी जवळ आल्याने अनेक शहरांमध्ये भाज्यांची मागणी वाढली आहे. परंतु आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहे. शेवगा, गाजर, बीट, कांदा, हिरवी आणि मिरचीच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, फ्लॉवर, ढोबळी मिरची, काकडी, मेथी, शेवगा, गाजर, बीट आणि भोपळ्याच्या दराच्या किंमतीत १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळं आता काही दिवसांपूर्वीच स्वस्तात मिळणाऱ्या भाज्या महागल्याने सामान्यांना खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.
सणासुदीचे दिवस असल्याने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे. कपडे, किराणा आणि अन्य साहित्यांची खरेदी करण्यासाठी लोक बाहेर पडत आहे. शहरांमध्ये शॉपिंग करण्यासाठी वीकेंडला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर वाढल्याने सामान्यांना ऐन सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
संबंधित बातम्या