आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं असताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या२५ जुलैपासूनराज्यात आरक्षण बचाव यात्रा (aarakshan bachao yatra) काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आरक्षण बचाव यात्रा एस सी,एस टी,ओबीसींच्या हक्काची लढाई असून याची सुरुवात दादरच्या चैत्यभूमीपासून होणार असल्याची माहिती प्रकाश आंबडेकर यांनी दिली आहे.ही यात्रा दादर चैत्यभूमीपासून निघणार असून संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे.
राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार गंभीर आहे का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.एकीकडे मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण देण्याची तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे.मात्र यालाओबीसी समाजाने विरोध केला आहे. यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.या आरक्षणाच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनीएससी, एसटी अन्ओबीसी आरक्षणासाठी२५जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले.
ही यात्रा २५ जुलै रोजी दादर चैत्यभूमीपासून सुरू होऊन कोल्हापूर, सांगली,सोलापूर, उस्मानाबाद,बीड,लातूर,नांदेड़,यवतमाळ,अमरावती,अकोला,बुलढाणा,वाशिम,जालना असे होत ८ ऑगस्ट रोडी छत्रपती संभाजीनगर येथे समाप्त होईल.
1. ओबीसींच्या आरक्षण वाचलं पाहिजे.
2. एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे.
3. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची स्कॉलरशिप तशीच्या तशी लागू करावी.
4. घाई गर्दी मध्ये कास्ट फॉर्म इशू करण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा.
5. जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच आहे.कारण ते ओबीसीत आहेत.
6. आरक्षणात एससी एसटी आणि ओबीसींना पदोन्नती मिळाली पाहिजे.
आम्ही रयतेतील गरीब मराठ्यांना अपील करणार आहोत की, श्रीमंत मराठा तुम्हाला आतापर्यंत फसवत आला आहे. टिकाऊ आरक्षण दिलं नाही. तेव्हा ओबीसींच्या आरक्षणवाद्यांच्या हातात सत्ता द्या, त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट, टिकाऊ ताट, वेगळं आणि स्थायी करून देणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमचा हेतू हा आहे की जी स्फोटक परिस्थिती झाली आहे. ती चिघळू नये. शांतता राहिली पाहिजे. ओबीसी संघटना आणि वंचित आघाडी यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. परंतू इतर राजकीय पक्षांनी म्हणजेच भाजप, काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाहीत. या पक्षांनीही भूमिका घ्याव्यात त्यामुळे ही स्फोटक परिस्थिती निवळण्यात मदत होईल. यानंतरच गावगाडा जो आहे तो पूर्ववत होईल, अशी आशा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या