लोकसभा निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू केली असून अनेक जाहीर सभांमधून मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी भ्रष्टाचार करतात की, नाहीत याबाबत आंबेडकरांनी जाहीर सभेत भाष्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी प्रत्येक सभांमध्ये घोषणा करतात की, ना खाऊंगा, ना खाने दुंगा. जनतेला वाटते की, यांनी बायकोला सोडून दिले आहे, मुलंही नाहीत. मग हा माणूस कोणासाठी कमावून ठेवणार? मोदींच्या पुढे-मागे कोणीच नसून हा कमावून करणार तर काय? त्यामुळे मी भ्रष्टाचार करणार नाही, या घोषणेवर जनतेचा विश्वास बसतो. वाटते की, हा माणूस खरं बोलत असावा.
मात्र मी तुम्हाला सांगतो, या बाबाचं खाणंही वेगळं आहे. तो खात नाही म्हणजे लाच घेत नाही किंवा भ्रष्टाचार करत नाही. याचे प्रमाणपत्र मी देतो. मात्र मोदी दुसऱ्यांना खायला देतो आणि त्यांना खायला देऊन झालं की, म्हणतो यातलं अर्ध मला.असा खळबळजनक आरोप आंबेडकरांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजप व आरएसएस म्हणतात की, आम्ही हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहोत. देशात हिंदू बहुसंख्य असताना हे धार्मिक राजकारण कशासाठी करतात, याचा खुलासा ते करत नाहीत.
संताची शिकवण संविधानाचे महत्व त्यांच्याकडून नाकारले जाते. उद्याचे संविधान कसे असेल याची ते चर्चा करीत नाहीत. मात्र त्यांच्याकडून जी वक्तव्ये केली जात आहे, ती हिटलरशाहीस पुरुस्कृत करणारी आहेत. आम्ही सांगतो तसेच करा. तोच उद्याच्या नवीन घटनेचा पाया असेल. ही नवी रचना येतांना आपल्याला विरोध होवू नये म्हणून अत्यंत सावध, पद्धतशीरपणे कार्यवाही केली जात आहे.
संबंधित बातम्या