Vasant More : मनसेनंतर आता वसंत मोरे वंचितचीही साथ सोडणार; ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, कारणही सांगितलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasant More : मनसेनंतर आता वसंत मोरे वंचितचीही साथ सोडणार; ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, कारणही सांगितलं!

Vasant More : मनसेनंतर आता वसंत मोरे वंचितचीही साथ सोडणार; ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, कारणही सांगितलं!

Jul 04, 2024 06:40 PM IST

Vasant more to join uddhav thackeray shivsena : वसंत मोरे २ महिन्यातच वंचितची साथ सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ९ जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

 वसंत मोरे मनसेनंतर वंचितचीही सोडणार साथ!
वसंत मोरे मनसेनंतर वंचितचीही सोडणार साथ!

Vasant More to Join Thackeray Group : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचितमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवणारेवसंत मोरे आता वंचितची साथही सोडणार असल्याचे समोर आले आहे. वसंत मोरे मनसे, वंचितनंतर आता उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ९जुलै रोजी त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरला आहे. याची माहिती वसंत मोरे (Vasant More) यांनीच दिली आहे.

वसंत मोरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतरच ते ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आता स्वत: वसंत मोरे यांनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपण ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याचे जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढवण्याची वसंत मोरे यांनी तयारी केली होती. यासाठी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली होती. मात्र महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांनी वंचितमध्ये प्रवेश करत त्यांच्याकडून लोकसभा लढवली होती.

मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरे यांना खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंचेएकेकाळचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी मनसेची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केला होता. मात्र २ महिन्यातच वसंत मोरे आतावंचितला सोडचिट्टी देत आहेत.९जुलै उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे आहे.

 

वसंत मोरे म्हणाले की, ९जुलै रोजी मी माझ्या समर्थकांसह मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणूक लढण्यासंबंधीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही त्यांनी सांगितलं. वंचित सोडण्याच्या कारणावर बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मी वंचितमध्ये गेलो होतो. मला मतदारांनी स्विकारलं नाही, याबाबत मी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो आहे. पुण्यात मतांचा टक्का हवा तितका नव्हता. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करत आहे.

 

Whats_app_banner