Vasantrao Deshmukh: जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले! भाजपचे जेष्ठ नेते वसंत देशमुख यांना अखेर अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasantrao Deshmukh: जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले! भाजपचे जेष्ठ नेते वसंत देशमुख यांना अखेर अटक

Vasantrao Deshmukh: जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले! भाजपचे जेष्ठ नेते वसंत देशमुख यांना अखेर अटक

Updated Oct 27, 2024 03:08 PM IST

Vasantrao Deshmukh arrested : संगमनेर येथील धांदरफळ येथे सुजय विखे पाटील मंचावर उपस्थित असतांना भाजपच्या सभेत जेष्ठ नेते वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांचे हे विधान त्यांना भोंवले असून या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले! भाजपचे जेष्ठ नेते गणेश देशमुख यांना अखेर अटक
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले! भाजपचे जेष्ठ नेते गणेश देशमुख यांना अखेर अटक

Vasantrao Deshmukh arrested : संगमनेर येथील धांदरफळ येथे भाजप नेते सुजय विखे पाटील मंचावर उपस्थित असतांना जेष्ठ नेते वसंतराव देशमुख याधी जीभ घसरली होती, त्यांनी भर सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात खालची पटली गाठत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. जयश्री थोरात यांनी वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे. संगमनेर तालुक्यात प्रचार सुर असतांना एका सभेत सुजय विखे पाटील यांच्या समोर वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, देशमुख हे या घटनेनंतर फरार होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. आज त्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने नगर जिल्ह्याच्या बाहेरील नर येथून अटक केली आहे. त्यांना नगर जिल्ह्यात आणून कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. वसंत देशमुख यांच्या आक्षेपार्ह व्यक्तव्याने त्यांच्यासह सुजय विखे पाटील देखील अडचणीत आली आहे. त्यांच्यावर व भाजपवर चौफेर टीका केली जात आहे.

काय म्हणाले वसंत देशमुख ?

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संकल्प सभेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. भर सभेत सुजय विखे मंचावर असताना भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत देशमुख यांची जयश्री थोरात यांच्याबद्दल बोलतांना जीभ घसरली. वसंत देशमुख हे बाळासाहेब थोरात यांना उद्देशून म्हणाले, आपल्या कन्येला समजवा...नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजय विखे पाटील हे त्यांना ताई म्हणतात. कारण ते सुसंस्कृत आहेत. या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहीत आहेत. वसंत देशमुख यांच्या या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जयश्री थोरात यांच्यासह तब्बल १२ तास ठिय्या यबंदोलण केले होते. त्यानंतर वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर