7-year-old Sexually Assaulted by Neighbour In Vasai: वसईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेतील मुख्य आरोपी फरार असून हे घृणास्पद कृत मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या १४ वर्षाच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना मुख्य आरोपीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत घरी परतल्यानंतर आईने तिला कारण विचारले आणि सत्य उघड झाले. यानंतर पीडिताच्या आईने त्वरीत जवळचे पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलीसोबत घडलेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी (वय, ७) आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी राहतात. दरम्यान, मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पीडिता घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका निर्जनस्थळी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. काही वेळानंतर मुलगी घरी रडत आल्यानंतर आईने तिला कारण विचारले. त्यानंतर पीडत मुलीने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच महिलेने स्थानिक पोलीस ठाणे गाठून शेजाऱ्याविरोधात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
आरोपी मुलीवर अत्याचार करत असताना एका १४ वर्षाच्या मुलाने हे घृणास्पद कृत आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कृत्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्या १४ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर मुख्य आरोपी फरार अद्यापही आहे. दोघांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५ (२) आणि ७७ आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलाला गुरुवारी बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.
मुंबईतील दोन अल्पवयीन मुलांनी स्नॅपचॅटवर मैत्री झालेल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. एवढेच नव्हेतर आरोपी मुलांनी पीडिताचा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला घरातील मोल्यवान वस्तू चोरण्यास भाग पाडले. घरातील रोकड आणि मौल्यवान वस्तू गायब होऊ लागल्याचे पीडिता आईच्या लक्षात येताच हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी पीडिताच्या आईने भायखळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ६४ (बलात्कार) आणि ३४१ (गुन्हेगारी धमकी) आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन आरोपीला डोंगरी बालगृहात पाठविण्यात आले आहे.