Vasai Murder: वसईत आज सकाळी संतापजनक घटना घडली. एका तरुणाने दिवसाढवळ्या २९ वर्षीय तरुणीची लोखंडी अवजाराने हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुणी यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तरुणीने आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडले. हाच राग डोक्यात ठेऊन आरोपीने तरुणीची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुणी रस्त्यावर पडलेली दिसत आहे. तर, आरोपी तिच्या बाजूला बसलेला दिसत आहे. आरोपीच्या हातात लोखंडी अवजार आहे. हातातील अवजार फेकून देण्यापूर्वी आरोपी तरुणीला माझ्यासोबत असे का केले, असे बोलत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ज्यावेळी आरोपीने तरुणीवर हल्ला केला, तेव्हा घटनास्थळी अनेकजण उपस्थित होते. मात्र, कोणीही हस्तक्षेप करून तरुणीला वाचवण्याचे धाडस केले नाही. अनेकजण व्हिडिओ शूट करताना दिसले. तर, काहीजण घटनास्थळावरून दूर जाताना दिसत आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेला मदत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता वाहनधारकही पुढे जाताना दिसले.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपीची अद्याप ओळख पटलेली नाही.या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचल्याचे किंवा आरोपीला ताब्यात दिल्याचे कोणतेही माहिती समोर आलेली नाही. प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
समृद्धी महामार्ग ते वडगाव रस्त्यावरील दातला फाट्याजवळ गुरुवारी (१३ जून २०२४) एका ऑटोचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. दिनेश हरिदास नागराळे (वय, ५०) असे मृताचे नाव आहे. मात्र, ही हत्या कोणी आणि का केली? हे अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश यांच्या पश्चात त्यांची पत्नी अलका (वय, ४१) आणि दोन मुली असा परिवार आहे. दिनेशची मोठी मुलगी बुटीबोरी येथे नर्सिंगचा कोर्स करत आहे. तर, दुसरी मुलगी हिंगणा येथील महाविद्यालयात शिकत आहे.
संबंधित बातम्या