Vasai Fire : वसईत प्लास्टिक कंपनीला भीषण आग; सर्व सामान जळून खाक-vasai fire news fire breaks out in factory in vasai ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasai Fire : वसईत प्लास्टिक कंपनीला भीषण आग; सर्व सामान जळून खाक

Vasai Fire : वसईत प्लास्टिक कंपनीला भीषण आग; सर्व सामान जळून खाक

Jan 16, 2024 12:12 AM IST

Fire breaks out in plastic Factory : वसईत एका इको रिसायकल कंपनीत आग लागली. यात मोठे नुकसान झाले आहे.

Vasai Fire
Vasai Fire

वसईत एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. ही कंपनी इको रिसायकल आहे. कंपनीतील प्लास्टिकच्या सामानाला आग लागल्याने आगीचा मोठा भडका उडाला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वसई पूर्व सातीवली सेलटर हॉटेलच्या बाजुला असलेल्या या कंपनीला आग लागली..

आगीची सुचना मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावरून मिळाल्या माहितीनुसार या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीत आग लागली त्यावेळी आतमध्ये कोणीही कामगार अडकले नसल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन जवानांनी कंपनीच्या आतमध्ये पाहणी केल्यावर कोणीही आढळले नाही. 

मुंबईत काळाचौकी परिसरातील महापालिका शाळेत सिलिंडरचे भीषण स्फोट

 मुंबईतील काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात असलेल्या साईबाबा पथ संकुल शाळेमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. तब्बल ६ सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटांमुळे भीषण आग लागली आहे. आगीचे लोळ दुरुवरून दिसत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे ४ बंब पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. दरम्यान हे स्फोट कसे झाले याची माहिती अद्याप समजू शकली नाही. दरम्यान,  शाळेला सुट्टी संक्रांतीनिमित्त सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

या शाळेत लग्नकार्याचा हॉल आहे. या ठिकाणी कैटरींगचा देखील व्यवसाय चालतो. या ठिकाणी जेवण तयार करण्याचे काम सुरू होते. या साठी येथे सिलेंडर देखील ठेवण्यात आले होते. दरम्यान, याच सिलेंडरचा स्फोट झाला असावा अशी प्राथमिक माहिती आहे.

विभाग