Vasai News : पाण्याच्या बाटलीत लघवी करून मुलींना प्यायला दिलं, वसईतील कंपनीमधील किळसवाणा प्रकार-vasai crime urine poured into water bottles and given to women ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasai News : पाण्याच्या बाटलीत लघवी करून मुलींना प्यायला दिलं, वसईतील कंपनीमधील किळसवाणा प्रकार

Vasai News : पाण्याच्या बाटलीत लघवी करून मुलींना प्यायला दिलं, वसईतील कंपनीमधील किळसवाणा प्रकार

Aug 17, 2024 12:20 AM IST

Vasai Crime News : कंपनीत रात्री झोपायला येणाऱ्या कामगारानीच हे किळसवाणं कृत्य केल्याचा आरोप मुलींनी आपल्या तक्रारीत केला आहे. ही घटना वसई पूर्वेच्या विशाल ११० या कंपनीत घडली.

वसई क्राईम
वसई क्राईम

सईतील एका कंपनात एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडला आहे. कंपनीत कामाला असणाऱ्या अज्ञाताने महिलांच्या पिण्याच्या बाटलीत लघवी केली होती. कंपनीत कामाला असलेल्या एका महिलेने पाणी समजून ते चुकून प्यायल्यामुळे हा प्रकार समोर आला. त्यानंतर कंपनीत काम करणाऱ्या तीन मुलींना मालकाकडे तक्रार केली. मात्र त्याने उलट मुलींवरच संशय घेतल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार नोंदवली. मुलींनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस चौकशी करत आहेत. 

कंपनीत रात्री झोपायला येणाऱ्या कामगारानीच हे किळसवाणं कृत्य केल्याचा आरोप मुलींनी आपल्या तक्रारीत केला आहे. ही घटना वसई पूर्वेच्या विशाल ११० या कंपनीत घडली. येथे इंमिटेशन ज्वेलरी बनवल्या जातात. या कंपनीत तीनच मुली काम करतात. या कंपनीच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या कंपनीतील कामगार येथे रात्री झोपण्यासाठी येतात. त्यांनीच हे कृत्य केल्याचा संशय आहे.

शुक्रवारी सकाळी या मुली कंपनीत आल्यावर त्यातील एका मुलीने पिण्याच्या बाटलीतील पाणी प्यायले. मात्र पाण्याचा उग्र वास व चव कशीतरीच लागल्याने तिने उलटी केली. बाटलीतील पाणी नीट पाहिले असता त्यात कोणीतरी लघवी करून ठेवल्याचे लक्षात आले. अन्य पाण्याच्या बाटल्यातही युरिन ठेवण्यात आल्याचा आरोप मुलींनी केला आहे.

या प्रकाराने हादरलेल्या मुलींनी याची माहिती मालकाला दिली व हा किळसवाना प्रकार रात्री झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा आरोप केला. मात्र मालकाने यावर काहीच कारवाई न करता उलट मुलींवरच संशय घेतला. यानंतर संतापलेल्या मुलींनी थेट वसईचं माणिकपूर पोलीस गाठून आरोपींसह कंपनीच्या मालकावरही कारवाई करण्याची लेखी तक्रार दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गाडीतून उतरली अन् महिलेनं अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी -

आत्महत्या करण्यासाठी महिलेने उडी मारताच तिच्याजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने तिच्या केसांना पकडून वरती ओढले. त्याचवेळी मार्गावरून जात असलेली पोलिसांची गाडी थांबली. गाडीतून उतरून ४ ते ५ पोलिसांनी संबंधित महिलेला वरती खेचून तिचे प्राण वाचवले. महिलेला मृत्यूच्या दाढेतून परत आणल्याबद्दल वाहतूक पोलिसांचे कौतुक केले जात आहे. पाच पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करून महिलेले वरती खेचले. यामुळे महिलेचा जीव वाचला आहे.