बदलापूरमधील एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घडनेने राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशी देण्याची मागणी केली जात आहे. या घटनेने राज्यातील समाजमन ढवळून निघाले असताना आता अशाच प्रकारची एक घटना वसईतील नायगाव येथून समोर आली आहे. नायगाव येथील शाळेमध्ये७वर्षांच्या चिमुकलीवर ४ ते ५ वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नायगावपूर्वेच्या एका खासगी शाळेत हा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या १६ वर्षीयअल्पवयीन मुलाने ७ वर्षीय चिमुकलीवर पाच ते सहा वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आले आहे. पीडित मुलगी शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत आहे. संबंधित कॅन्टीन चालक त्रास देत असल्याच तक्रार पीडित मुलीने शिक्षिकेकडे केली होती. त्यानंतरशिक्षिकेने हा प्रकारमुख्याध्यापकांना सांगितला.
विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनी शाळेची बदनामी होईल हा विषय मनात न आणताहे प्रकरण न लपवता त्यांनी थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीने हा प्रकार पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी हे गांभीर्याने घेतले नाही. हा प्रकार उघड झाल्यानंतरही मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी तयार नव्हते. मात्र मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हा प्रकार दडवून न ठेवता पोलिसांना माहिती दिली.
बदलापूरची घटना उघडकीस आल्यानंतर सर्व शाळा सतर्क झाल्या आहे. बदलापूरच्या घटनेनंतर नायगाव पोलिसांनी प्रत्येक शाळेत गुड टच आणि बॅड टच हे शिबिर घेतलं होतं. या शिबिरानंतर पीडित मुलीने आपल्या शिक्षिकेला आपल्यावरील अत्याचाराही ही घटना सांगितली आणि हा सर्व प्रकार उघड झाला. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करूनअल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला रिमांड होममध्ये रवाना करण्यात आले आहे. अल्पवयीन आरोपीने मुलगी वॉश रूम, हॅन्ड वॉश करायला जाताना पीडित मुलीला स्पर्श करणे, नको त्या ठिकाणी हात लावणे हे प्रकार करत असल्याचे समोर आले आहे.
अल्पवयीनआरोपी गेल्या १५ दिवसांपासून मुलीवर लैंगिकअत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. शाळेत असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. तसेच आरोपीने अन्य मुलींवर अत्याचार केला आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत. या शाळेचे कॅन्टीन परप्रांतीय तिवारी नामक व्यक्ती चालवत आहे. त्याने कामासाठी उत्तप्रदेशमधून मुलगा कामाला आणला होता. आरोपी दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून येथे काम करण्यासाठी आला होता.