मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ravindra Waikar: खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल, नेमके कारण काय?

Ravindra Waikar: खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल, नेमके कारण काय?

Jun 15, 2024 07:16 PM IST

Mangesh Pandilkar: शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024: शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर यांच्याविरोधात वनराई पोलिस ठाण्यात गुन्ह्यात दाखल करण्यात आला. पंडिलकर यांच्यावर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात यांनी स्वत: जवळ फोन ठेवल्याचा आरोप आहे. याआधी मुंबई उत्तर-पश्चिममधील भारत जन आधार पक्षाचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी मतमोजणी केंद्रात फोन वापरल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध वनराई पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी ही पोलीस कारवाई करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रियेदरम्यान फोन, लॅपटॉप, टॅबलेट, संगणक आणि कॅल्क्युलेटर यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तरीही गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात एक व्यक्ती फोनचा वापर करताना आढळले. तहसीलदारांच्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून शिंदे गटाचा उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पांडिलकर असल्याची माहिती समोर आली. यानंतर वनराई पोलिसांनी मंगेश पांडिलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी वनराई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ सर्वात चर्चेचा विषय ठरला. अटीतटीच्या लढाईत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. अमोल कीर्तिकर याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे बोलले जात आहे. अमोल कीर्तिकर त्यांच्या एजंटच्या टीमने ६५० पेक्षा जास्त आघाडी असल्याचे सांगितले आणि नंतर ईव्हीएम मतात एका मताचा फरक सांगितला. ईव्हीएममध्ये विजय आणि पराभवामधील फरक फक्त एक मताचा आहे, त्यामुळे मतांची पुन्हा मोजणी व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर