मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande Mataram GR: महाराष्ट्रात उद्यापासून ‘हॅलो’ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे, सरकारचा जीआर निघाला

Vande Mataram GR: महाराष्ट्रात उद्यापासून ‘हॅलो’ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे, सरकारचा जीआर निघाला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 01, 2022 08:27 PM IST

स्वातंत्र्यांच्याअमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधूनउद्या म्हणजे२ ऑक्टोबरपासूनया अभियानाचीसुरुवात होत आहे. संवादाची सुरुवात करताना यापुढे हॅलो ऐवजी वंदे मातरम (Vande Mataram) म्हणावे लागणार आहे.

महाराष्ट्रात उद्यापासून ‘हॅलो’ऐवजी'वंदे मातरम' म्हणावे
महाराष्ट्रात उद्यापासून ‘हॅलो’ऐवजी'वंदे मातरम' म्हणावे

Vande mataram GR Maharashtra : शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फोनवर संवादाची सुरुवात करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम (Vande Mataram) म्हणण्याचे निर्देश दिले होते. यावर राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र आता शिंदे सरकारकडून याबाबतचा अध्यादेश (जीआर) जारी करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून उद्या म्हणजे २ ऑक्टोबरपासून या अभियानाची सुरुवात होत आहे. वंदे मातरम म्हटल्यावर इंग्रज रागवायचे, दंड करायचे. महाराष्ट्रात यापुढे फोनवर असो की एकत्र येऊन बोलताना हॅलो ऐवजी, वंदे मातरमने संवादाची सुरुवात करण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने जीआर काढला आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजनमहात्मा गांधी जयंतीनिमित्त उद्याकरण्यात आले आहे.. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून २ ऑक्टोबरपासून वंदे मातरम अभियानाची सुरुवात होत आहे. बकिम चंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठमध्ये वंदे मातरम गीत लिहिताना याला राष्ट्रगान म्हणून मान्यता देण्यात आली. इंग्रजांना हे गीत त्रास देणारे वाटायचे. मात्र शब्द आम्हाला प्राण प्रिय आहेत.

 

संभाषणाची सुरुवात हॅलोनेहोते.यापुढे ती वंदे मातरमने व्हावी, मग ती मोबाईलवर असो की दोघांमधील चर्चा, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच हे अभियान आहे, सक्ती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या