मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande Bharat: खुशखबर! कोल्हापूर-मुंबई मार्गावर लवकरच धावणार ‘वंदे भारत’; वाचा सविस्तर

Vande Bharat: खुशखबर! कोल्हापूर-मुंबई मार्गावर लवकरच धावणार ‘वंदे भारत’; वाचा सविस्तर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2024 08:03 PM IST

Vande Bharat Train : कोल्हापूर-मुंबई दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. यामुळे सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रवाशांनाही मोठा लाभ होणार आहे.

Vande Bharat Train
Vande Bharat Train

Vande Bharat: देशभरात आतापर्यंत जवळपास सर्व राज्यांना वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. देशात अनेक वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. मागील महिन्यात पंतप्रधान मोदींनी अयोध्याहून एकाच वेळी पाच वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. आता लवकरच नव्या मार्गावर आणखी एक वंदे भारत ट्रेन लाँच केली जाणार आहे. 

रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले की, कोल्हापूर-मुंबई दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. यामुळे सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रवाशांनाही मोठा लाभ होणार आहे.

कोल्हापूरहून मुंबई मार्गावर धावणाऱ्या नवीन महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेनला दानवेंनी व्हर्चुअल पद्धतीने मुंबईतून हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक आदि उपस्थित होते. यावेळी दानवे यांनी आश्वासन दिले की, दोन महिन्याच्या आत कोल्हापूरला वंदे भारत ट्रेनची भेट दिली जाईल. 

गेल्यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये भारतीय रेल्वेने ३४ वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले होते. यावर्षी देशात ६० नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचे उदिष्ट आहे. नव्या वर्षात १४ राज्ये व दोन केंद्र शासित प्रदेशांना वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. भारतील रेल्वेला २०२४ मध्ये एकूण ७० नव्या ट्रेन मिळणार आहेत. यापैकी ६० ट्रेन १५ नोव्हेंबरपर्यंत मिळतील ज्या नव्या मार्गावर धावतील. रेल्वेने आतापर्यंत ३५ मार्ग निश्चित केले असून त्यावर नव्या वंदे भारत ट्रेन धावतील. अन्य मार्गांचे सर्वेक्षण सुरू आहे.

WhatsApp channel