Vande bharat express : वंदे भारतच्या प्रवाशांसाठी खुशखबर..! रेल्वे देणार लवकरच मोठी भेट-vande bharat express train speed tail at 160 kmph on mumbai ahmedabad corridor ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande bharat express : वंदे भारतच्या प्रवाशांसाठी खुशखबर..! रेल्वे देणार लवकरच मोठी भेट

Vande bharat express : वंदे भारतच्या प्रवाशांसाठी खुशखबर..! रेल्वे देणार लवकरच मोठी भेट

Apr 12, 2024 05:12 PM IST

Vande Bharat Express : मुंबई -अहमदाबाद ट्रेनचे स्पीड वाढवण्यात येणार आहे. यामुळे मुंबई आणि अहमदाबाद मार्गावरील प्रवासात जवळपास ४५ मिनिटांची बचत होणार आहे.

वंदे भारतचा स्पीड वाढणार
वंदे भारतचा स्पीड वाढणार

मुंबई आणि अहमदाबाद (Mumbai Ahmedabad corridor) दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे. पश्चिम रेल्वेच्या या मार्गावर वेगवान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे (Vande bharat express train) ट्रायल केले जात आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS)कडून हिरवा झेंडा दाखवला आहे. वंदे भारत ट्रेन्स आपली गती व चांगल्या सुविधांसाठी ओळखली जाते. सध्या या ट्रेनची गती १३० किमी प्रति तास आहे, ती वाढवून १६० किलोमीटर प्रति तास करण्याची तयारी आहे. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद मार्गावरील प्रवासात जवळपास ४५ मिनिटांची बचत होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी जवळपास ५ तास २५ मिनिटांचा वेळ लागतो.

'मिशन रफ्तार' प्रोजेक्टच्या अंतर्गत वंदे भारत ट्रेन्सची (Vande bharat train Speed) स्पीड १६० किमी प्रतितास पर्यंत पोहोचवण्याचा प्लान आहे. या गतीने वंदे भारत धावण्यासाठी रेल्वेच्या काही यंत्रणांमध्ये काही सुधार करावे लागणार आहेत. याची सुरूवात मुंबईतून होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद मार्गावर पहिली वेगवान वंदे भारत ट्रेन धावणार आहे. पश्चिम रेल्वेकडून याच्या अंतिम टप्प्याच्या मंजुरीसाठी फेब्रुवारी महिन्यात CRS शी संपर्क साधला होता.

सीआरएस उड्डाण मंत्रालयाचा भाग आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई अहमदाबाद मार्गावरील ७९२ किमीपर्यंत सेफ्टी बॅरियर लावण्यासोबत इंजीनिअरिंग काम पूर्ण केले आहे.आता ट्रायलसाठी १६ बोगींची वंदे भारत ट्रेन लावली जाईल. यासाठीची तयारीला अंतिम रूप दिले जात आहे.

सध्या १२० ते १३० किमी प्रति तास वेगाने धावत आहे वंदे भारत -
 

पश्चिम रेल्वेकडून सांगितले जात आहे की, 'मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरवर १६० किमी प्रतितास वेगाने ट्रेन चालवण्यासाठी आवश्यक काम पूर्ण केले जात आहेत. रेल्वेसाठी मोठे यश आहे. वंदे भारत ट्रेनच्या वेगवान ट्रायल याच महिन्यात सुरू केली जाईल. सध्याचा वेळ १२० -१३० किमी प्रतितासावरून १६० किमी प्रति तासपर्यंत अपग्रेड केला जाईल.

मुंबई-सूरत-वडोदरा-दिल्ली आणि मुंबई-वडोदरा-अहमदाबाद सेक्टर १६० किमी प्रतितास वेगाने धावण्यास तयार आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या या प्रोजेक्टचा अंदाजे खर्च ३,९५९ कोटी आहे. यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.

Whats_app_banner